maharashtra government to serve shivbhojan in just ten rupees 
विदर्भ

दहा रुपयांमध्ये मिळेल शिवभोजन, 50 ठिकाणी होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दहा रुपयांत गोरगरिबांना जेवण देण्याचे वचन शिवसेनेने पाळला आहे. येत्या काळात गोरगरिबांना दहा रुपयांत शिवभोजन मिळणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता. 21) विधानसभेत केली. विशेष म्हणजे, शिवसेनेने निवडणुकीच्या वचननाम्यात याबाबत उल्लेख केला होता. 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी लावून धरली होती. यावरून सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील घोषणाबाजी करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा मुद्यावरून विरोधकांनी संपूर्ण अधिवेशन काळात धारेवर धरण्याचा प्रयत्न केल होता. अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार हे सरकार शब्दाला जागले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा तोंडाला पाने पुसल्याचा आरोप फडणवीसांनी केला. 

पूर्व विदर्भासाठी स्टिल प्लांटची घोषणा

विदर्भात 123 सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहेत. यापैकी कोणत्याही कामांना स्थगिती दिलेली नाही. विदर्भातील सिंचनाचे सर्व प्रकल्प जून 2023 पर्यंत पूर्ण करणार आहोत. तसेच पूर्व विदर्भात जमशेदपूर व भिलाईच्या धर्तीवर स्टिल प्लांट उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

पुढे व्याप्ती वाढणार

दहा रुपयांत गोरगरिबांना जेवण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या काळात गोरगरिबांना दहा रुपयांत शिवभोजन मिळणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ही योजना राज्यातील 50 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून, पुढे याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT