नागपूर  :  भाजपच्या सदस्य अभियानाची माहिती देताना शिवराजसिंग चौहान. शेजारी अनिल सोले, गिरीश व्यास, प्रवीण दटके.
नागपूर : भाजपच्या सदस्य अभियानाची माहिती देताना शिवराजसिंग चौहान. शेजारी अनिल सोले, गिरीश व्यास, प्रवीण दटके.  
विदर्भ

महात्मा गांधींची इच्छा राहुल पूर्ण करीत आहेत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी कॉंग्रेस पक्ष भंग करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तत्कालीन कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचे पालन केले नाही. आता राहुल त्यांची महात्मा गांधी इच्छा पूर्ण करीत असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच भाजपच्या राष्ट्रीय सदस्य अभियानाचे प्रमुख शिवराजसिंग चौहान यांनी केले.
सदस्य नोंदणी कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी चौहान नागपूरला आले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी नेहरू-गांधी यांच्या घराण्याच्या एकाधिकारशाहीमुळे कॉंग्रेसला इतके वाईट दिवस आल्याचे सांगितले. त्यांना आपल्या घराण्याशिवाय कोणालाच पक्षात मोठे होऊ द्यायचे नाही. नाइलाजाने घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष व पंतप्रप्रधान केले असले तरी त्यांनी सर्व सूत्रे आपल्याच हातात ठेवली. राहुल गांधी फक्त राजीनाम्याचे नाटक करीत आहेत, असाही आरोप यावेळी चौहान यांनी केला.
कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामे दिला. त्याचे खापर भाजपवर फोडल्या जात आहे. ज्यांना स्वतःचे आमदार सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. गोव्यामध्येही कॉंग्रेसचे दहा आमदार भाजपात सहभागी झाले. मध्य प्रदेशातही अस्वस्थता आहे. याला भाजप जबाबदार नसून कॉंग्रेसचे नेतृत्वच असल्याचेही चौहान म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, मिलिंद माने, माजी आमदार अशोक मानकर, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पारडीकर, जयप्रकाश गुप्ता, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT