File photo
File photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 संचेती-एकडे यांच्यातील तुल्यबळ लढतीने रंगत

वीरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (बुलडाणा ) : मलकापूर विधानसभा मतदारसंघात खरी लढत ही कॉंग्रेस व भाजपमध्येच होणार असल्याचे सध्या चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असलेले विजय गव्हाड हे नेमकी युतीची बिघाडी करणार की आघाडीची, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही निवडणुकांचे चित्र बघता नांदुरा तालुक्‍यातून भाजपला मोठ्या प्रमाणात लीड मिळत आली आहे. मात्र, यंदा या तालुक्‍यातून कॉंग्रेसने उमेदवार दिला असल्याने तालुक्‍यातील गणित काही वेगळे असणार आहे.
विधानसभेची निवडणूक आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण पूर्णतः तापले आहे. आपापल्या परिने सर्वच राजकीय पक्ष व कार्यकर्ते विजयाचे दावेप्रतिदावे करीत असले, तरी या मतदारसंघात आघाडीचे राजेश एकडे व युतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्यातच सरळ लढत होणार आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नितीन नांदूरकर व अपक्ष असलेले विजय गव्हाड हे अनपेक्षित मते घेऊन नेमकी कुणाची विकेट काढणार, हे पाहावे लागणार आहे.
जातीय समीकरण बघता या मतदारसंघात मराठा, मुस्लिम व लेवा पाटीदार समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. यातही कोणता समाज कुणाकडे वळतो, यावर बरेच राजकीय गणित अवलंबून असणार आहे. गेल्या पंचवार्षिकपासून भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व आ. संचेती करत आहेत. कॉंग्रेसने आतापर्यंत जातीय समीकरणातून या तिन्ही समाजांना मलकापूर तालुक्‍यातून नेतृत्व देऊन आजमावून पाहिले. परंतु, विजयश्री खेचता आली नाही. या वेळेस प्रथमच भाजपला लीड देणाऱ्या नांदुरा तालुक्‍याला कॉंग्रेसच्या उमेदवारीची लॉटरी लागल्याने काहीसे चित्र बदलणार की पुन्हा तीच पुनरावृत्ती होणार, हे निवडणुकीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणारच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT