वरठी : भरधाव वाळूच्या ट्रॅक्‍टरने धडक दिल्याने व्यक्तीचा मृत्यू झाल्याने जमावाने घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. 
विदर्भ

भरधाव वाळूच्या ट्रॅक्‍टरने घेतला व्यक्तीचा बळी...मग संतप्त जमावाने केला चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा

वरठी/मोहाडी (जि. भंडारा) : भरधाव वाळूच्या ट्रॅक्‍टरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 2) सायंकाळी तालुक्‍यातील कोथुर्ना गावाशिवारात घडली. शरद उके (वय 35, रा. कोथुर्ना), असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त जमावाने घटनास्थळी गर्दी केली होती.

कोथुर्ना येथील शरद उके (वय 35) काही कामानिमित्त वरठी येथे आला होता. सायंकाळी तो गावाला परत जात असताना गावापासून एक किमी दूर अंतरावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाळू भरलेल्या ट्रॅक्‍टरने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

जिल्ह्यात वाळू वाहतुकीचा धुमाकूळ

जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे अपघात होऊन अनेकांचे जीव जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच गावातील शेकडो नागरिकांनी चक्काजाम आंदोलन करून मृताच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच वाळू वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली आहे.

मृतदेह उचलण्यास गावकऱ्यांचा नकार

व्यक्तीच्या अपघाती मृत्यूमुळे गावात तणाव पसरला आहे. गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यासही नकार दिला होता. मात्र पोलिसांना पाचारण केल्यावर गावकरी शांत झाले. पोलिस निरीक्षक राजेश कुमार थोरात घटनास्थळी ताफ्यासह उपस्थित होते. भंडारा येथून अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे. अजूनपर्यंत मृतदेह उचलण्यात आले नव्हते.

वाळू वाहतुकीचा ट्रॅक्‍टर गावातील व्यक्तीचाच

वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर गावातील व्यक्तीचाच असल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. मृताच्या मागे आईवडील, पत्नी व दोन अपत्य असल्याची माहिती मिळाली आहे. खबरदारी म्हणून गावात पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मृताच्या कुटुंबीयांना समजण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT