विदर्भ

बालकाच्या अपहरणाचा मंगरूळपीर येथे प्रयत्न

सकाळवृत्तसेवा

मंगरूळपीर - स्थानिक गवळीपुरा येथील एका पाच वर्षांच्या बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. मात्र, चिमुकल्याच्या प्रसंगावधानाने तो अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटला. ही घटना गुरुवारी (ता. 23) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - येथील गवळीपुरा भागातील रहिवासी चॉंद रन्नू बेनीवाले यांचा मुलगा काल दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेला होता. मात्र, बराच वेळ उलटूनही तो परत आला नाही. त्यामुळे येथील मशिदीच्या ध्वनिक्षेपकावरून माहिती देण्यात आली.

त्यानंतर काही काळाने मुलगा भेदरलेल्या अवस्थेत घरी आला. एका पुरुषासह महिलेने आपल्याला पेट्रोलपंपाजवळ बांधून ठेवले होते. जवळ कुणीही नसताना आपण हात-पाय सोडून पळून आल्याचे त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT