नागपूर : अंबादास मोहिते यांचा सत्कार करताना नरेंद्र मोहिते; बाजूला जयसिंह राजे भोसले, वंदना शिर्के-रोटकर व समाजबांधव.
नागपूर : अंबादास मोहिते यांचा सत्कार करताना नरेंद्र मोहिते; बाजूला जयसिंह राजे भोसले, वंदना शिर्के-रोटकर व समाजबांधव.  
विदर्भ

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही कायम राहील

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मराठा समाजाला उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयातसुद्धा कायम राहील, असा विश्‍वास मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल तयार करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणारे अंबादास मोहिते यांनी व्यक्त केला.
सकल मराठा समाजातर्फे नागपूर भेटीवर आलेले अंबादास मोहिते यांचा शनिवारी महालातील सिनीअर भोसला पॅलेसमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी जयसिंह राजे भोसले, वंदना शिर्के-रोटकर, सकल मराठा समाज, नागपूरचे संयोजक नरेंद्र मोहिते उपस्थित होते. समितीनेसुद्धा मराठा समाजाला आरक्षण देऊ केले होते. परंतु, या समितीला संवैधानिक दर्जा नव्हता. यानंतर मागासवर्गीय आयोगाने मराठा जातीला मागासवर्गीय ठरविले. आयोगाच्या अहवालामुळे आरक्षणाची मागणी न्यायालयात मंजूर झाली. सर्वोच्च न्यायालयात केवळ टक्केवारीच कमी-अधिक होऊ शकेल. लढा सुरूच ठेवावा लागणार आहे. सर्वजाती मिळून 32 टक्के आरक्षण आहे. मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण मिळाले, हीसुद्धा मोठी बाब आहे. आरक्षणाच्या लढ्यात खारीचा वाटा उचलता आला याचा आनंद आहे. मिळालेले आरक्षण बलिदान देणाऱ्यांना अर्पण केले जावे, अशी अपेक्षा मोहिते यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक व संचालन नरेंद्र मोहिते यांनी केले. कार्यक्रमाला शिरीष राजेशिर्के, सुधीर मोहिते, कृष्णराव गायकवाड, गजानन कावळे, गुणवंत माने, संजय घारगे, दिलीप धंदरे, गजेंद्र जाधव, विजय काळे, छोटू पवार, अरविंद जाधव, विजय घोरपडे, प्रकाश खंडागळे, बाळासाहेब गायकवाड, उदयराव शिंदे, दीपक जाधव, तेजसिंह मोरे, गंगाधर गीते, गौरव काटकर, प्रमोद सुरतकर, विनोद देशमुख, समीर निकम, राजू सावंत, संदीप कदम, मंगेश पवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

SCROLL FOR NEXT