acid-attack 
विदर्भ

अज्ञात युवकाचा मायलेकावर अॅसिड हल्ला

राहुल मैंद

निलज : ब्रम्हपुरी तालुक्यातील चकबोथली येथे एका युवकाने गाढ झोपेत असलेल्या माय-लेकावर अॅसिडने हल्ला केल्याची घटना २९ नोव्हेंबरच्या पहाटे घडली. सदर घटनेत महिला व तिचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ माजली असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला आहे. आरोपीचे नाव अमोल चौधरी (२३) असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर माहीतीनुसार पीडीत महिला ही आपल्या मुलासोबत झोपली होती. तेव्हा पहाटेच्या सुमारास आरोपीने महिलेच्या घरात प्रवेश करुन साखर झोपेत असलेल्या माय-लेकावर अॅसिड फेकले. यात मायलेक गंभीर जखमी झालेत. यानंतर जखमींना त्वरीत ग्रामीण रूग्णाल़य ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींची अवस्था गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णाल़य गडचिरोली येथे हलविण्यात आले. 

सदर घटनेमागील कारण अस्पष्ट असून पोलिस घटनेमागील कारणाचा शोध घेत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर घटनेचे खरे कारण समोर येईल. सदर  घटनेतील आरोपीवर ३०७, ३२६(अ), ४५० कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक कडके, ठाकरे, मडावी, नेरलवार, महीला पोलिस शिपाई सुष्मा बारापात्रे इ. पोलिस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT