selfie
selfie 
विदर्भ

मतदाराकडे गेलात ना, मग सेल्फीही पाठवा

संदिप रायपुरे

गोंडपिपरी : येत्या दहा डिसेंबरला सिनेटची निवडणूक होत असून, या निवडणुकीत पदवीधारांना मतदान करायचे आहे. भाजप, काँग्रेस समर्पित अनेक उमेदवार रिंगणात आहेत. विजयासाठी ते जिवाचे रान करीत आहेत. संचालक असलेला उमेदवारही या निवडणुकीत उभा आहे.

पदविधारकांचे मत आपल्याच मिळावे यासाठी त्याने अनोखा फंडा अवलंबिला आहे. आपल्या संस्थेतील प्राध्यापकांना त्याने या कामात गुंतविले. पदवीधर मतदारांचा घर गाठून आमच्याच साहेबांना मत दया! अशी हाक ते देत आहेत. पण त्या संचालकाला प्राध्यापक विश्वास नसल्याने मतदाराची भेट घ्या अन त्त्यांचा सोबतची सेल्फीही पाठवा असा फतवाच त्याने काढला आहे. यामुळे प्राध्यापक मतदारांचा घरी जावून, मतदारासोबतची सेल्फी त्या संचालकाकडे पाठवीत आहेत. या अनोख्या प्रकाराची चर्चा पदवीधर मतदार रंगवून सांगत आहेत.

येत्या दहा डिसेंबरला गोंडवाना विद्यापीठाचा सिनेटची निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय पक्षासोबतच अपक्ष उमेदवारांची गर्दी आहे. एका पदवीधराला दहा मते द्यायची आहेत. यातील पाच मते सर्वसाधारण तर पाच मते आरक्षित उमेदवारांसाठी राखीव आहेत. गोंडवाना विद्यापिठांतर्गत अनेक मातब्बर मंडळी उभी आहेत. उमेदवारांची जमवाजमव करुन त्यांनी आपले स्वतंत्र गट तयार केले आहे. आपआपल्या परिने प्रचार जोरात सूरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेतील एक मातब्बर संचालक या निवडणुकीत उभा आहे.

विजयासाठी हा जिवाचे रान करीत आहे. आपल्या संस्थेतील प्राध्यापकासह सर्व कर्मचाऱ्यांना त्याने कामाला लावले आहे. मतदारापर्यंत जावून साहेबांनाच मत दया अशी विनवनी कर्मचारी करीत आहेत. पण आपल्याच कर्मचाऱ्यावर विश्वास नसल्याने मतदाराकडे जावून प्रचाराचे पत्रक मतदाराचा हातात देवून संबधितांसह मतदारांची सेल्फी काढण्याचे प्रकार सूरु आहे. अनेक पदवीधर सेल्फीला नकार देत असतांनाही मतदाराची विनवनी करीत प्राध्यापक सेल्फी काढत आहेत. या प्रकाराची खमंग चर्चा सूरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT