Marathi News Mahagaon Lack of Water Common People
Marathi News Mahagaon Lack of Water Common People 
विदर्भ

नाईकांच्या मतदारसंघात पिण्याच्या पाण्यासाठी जनतेची भटकंती

ज्ञानेश्‍वर ठाकरे

महागाव - संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महागाव तालुक्यासह शहरात पाणी टंचाई संदर्भात विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचेसह जि. प. अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडल्या. सभांचे फलित मात्र सध्यातरी आलेले नाही. उमरखेड, महागाव विधानससभा व पुसद विधानसभा क्षेत्र या दोन्ही विधासनसभा क्षेत्रात महागाव तालुक्यातील काही गावे विभागल्या गेली आहेत. त्यामुळे विविध विकास कामे अडगळीत राहतात. 

पाणी टंचाईवर मागील दोन महिन्यापूर्वीच आढावा सभा आयोजित करुन सुद्धा संभाव्य पाणी टंचाईचे पिण्याच्या पाण्याचे अद्याप नियोजन करण्यात आले नाही. पुसद विधानसभा मतदारसंघावर नायकांचेच अधिराज्य आहे. परंतु नाईकांच्या या मतदारसंघात मात्र जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याची सदृष्य परिस्थिती दिसून येत आहे. महागाव तालुक्यातील शेवटाच्या टोकावरील असलेल्या सेवादास नगर, माळवागत, कासोळा, वागत, वडद या गावांत दरवर्षीच भीषण पाणीटंचाई निर्माण होते. कायमस्वरुपी कोणत्याही उपाययोजना याठिकाणी करण्यात न आल्याने सातत्याने जनतेला पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. 

दरवर्षीपेक्षा यंदाच्या पावसाळ्यात निम्मेच्या आतच पाऊस कोसळला. परिणामी विहिरींची पातळी खालावली. बोअर आटले. लहान-मोठी जलाशय सुद्धा बऱ्याच प्रमाणात रिकामी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या संदर्भात प्रशासकीय स्तरावरून पाणीसाठा राखून ठेवण्याची काळाची गरज आहे.

पुसद विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज वास्तव्यास आहे. त्यामुळे तांडा वस्तीचा विकास केव्हाच व्हायला हवा असतांना सुद्धा आजतागायत मात्र तांडा वस्तीतील नागरीक मूलभूत सोई सुविधेपासून अद्याप वंचित आहेत. या विभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील जनतेच्या सुखदुखाची जाण ठेवणे ही प्रमुख जबाबदारी असतांना मात्र मतदार संघातील नागरिकांना पाहीजे त्या मूलभूत गरजा अनेक वर्षांपासून पुर्णत्वास गेल्या नाहीत.

या संदर्भात प्र. तहसिलदार एन. जे. ईसळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, 'संभाव्य पाणी टंचाईची सदृष्य परिस्थिती पाहता मागील दोन दिवसापूर्वी तालुक्यातील घोंसरा, वागत, काळी दौलत ईजनी, कोनदरी या गावांना भेटी देऊन परिसरातील जलाशयालावरील मोटारपंप तूर्तास बंद केले आहेत. पाणीसाठा राखून ठेवण्याच्या कार्याला सुरवात केली आहे. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडून अद्याप पाणी टंचाईचे कळविण्यात आले नाही. आल्यास आम्ही तात्काळ यावर कार्य सुरू करू.'

तालुक्यातील वागत येथील शेतकरी नेते मनीष जाधव यांनी दि. ७ सप्टेंबर २०१७ ला संभाव्य पाणी टंचाई संदर्भात शासनाने पूर्व नियोजन करावे अशा प्रकारचे एक लेखी निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले होते. परंतु या लेखी निवेदनाची दाखल घेतल्या गेली नाही. लेखी निवेदन सादर करुन तीन महिन्याचा कार्यकाळ लोटल्यानंतर काल दि. ३ जानेवारी ला महसुलाचे उपविभागीय आधिकारी स्वप्नील कापडनिस यांची श्री. जाधव यांनी भेट घेतली. दरम्यान पाणी टंचाई संदर्भात गंभीरतेने पाऊल उचलल्या जाणार असल्याचे कापडनिस यांनी आश्वासन दिल्याचे जाधव यांनी बोलतांना स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT