File photo of Devendra Fadnavis
File photo of Devendra Fadnavis 
विदर्भ

अधिवेशन उद्यापासून; फडणवीस सरकारची कसोटी 

प्रशांत बारसिंग

नागपूर : ऑनलाइन कर्जमाफीत झालेला अभूतपूर्व घोळ, पावणेदोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा न होणे, योग्य दर मिळत नसल्याने हैराण झालेला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी, ओखी वादळ आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने झालेले नुकसान, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आदी मुद्द्यांमुळे अधिवेशनात फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. 

विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून (ता. 11) नागपूर येथे सुरवात होत आहे. मुख्य्मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे हे चौथे हिवाळी अधिवेशन आहे. तीन वर्षांत राज्य सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधी पक्ष एकवटले आहेत.

शेतकरी, शेतमजूर प्रश्‍नांवर आक्रमक होत दोन्ही कॉंग्रेसने राज्यभर भाजपविरुद्ध वातावरणनिर्मिती चालवली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबरला दोन्ही कॉंग्रेसचा संयुक्त मोर्चा अधिवेशनावर धडकणार आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी आणि गोंधळाचा ठरण्याची शक्‍यता आहे.

फडणवीस यांनी 24 जूनला 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. यासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेतले. त्यानंतर दिवाळीचा मुहूर्त साधत 18 ऑक्‍टोबरला त्यांच्याच हस्ते कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले. मात्र, त्यानंतर ऑनलाइन कर्जमाफीतील घोळ उघडकीस आला. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये गोंधळ असल्याने कर्जमाफी लांबणीवर पडली आहे. राज्य सरकारने ऑनलाइन कर्जमाफीतील घोळाचा ठपका सनदी अधिकारी विजयकुमार गौतम यांच्यावर ठेवत त्यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागातून उचलबांगडी केली. विरोधी पक्षांकडून हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरला जाण्याची शक्‍यता आहे. 

सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, नवी मुंबईतील बॅंकेवरचा दरोडा, महिला आणि बाल अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खालावली आहे. विरोधी पक्षांकडून हे मुद्दे उपस्थित करून गृह खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमण्याची मागणी होऊ शकते. राजापूर येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला होणाऱ्या विरोधाचा मुद्दा कोकणातील आमदारांकडून उपस्थित केला जाण्याची शक्‍यता आहे. 

गुजरात निवडणुकीचे सावट 
अधिवेशनावर गुजरात विधानसभा निवडणुकीचे सावट असणार आहे. राज्यातील भाजप आणि कॉंग्रेसचे नेते काही दिवसांपासून गुजरातच्या मोहिमेवर आहेत. गुजरात निवडणुकीचा दुसरा आणि शेवटचा टप्पा 14 डिसेंबरला पार पडेल. 18 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. गुजरातची निवडणूक भाजप आणि कॉंग्रेस या दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे तेथील निकालाचे पडसाद सभागृह आणि सभागृहाबाहेर उमटण्याची शक्‍यता आहे. 

गाजणारे मुद्दे... 

  • 'मी लाभार्थी' जाहिरात 
  • समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध 
  • सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरण 
  • खर्डा प्रकरणातील आरोपींची सुटका 
  • मुंबईत वाहन उचलण्यासाठी दिलेल्या कंत्राटातील गैरव्यवहाराचे आरोप 
  • कीटकनाशक फवारणीत झालेला 30 शेतकऱ्यांचा मृत्यू 
  • शिक्षण खात्यातील अनागोंदी, मुंबई विद्यापीठाच्या निकालातील घोळ 
  • गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे झालेले नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT