Crime
Crime 
विदर्भ

दोन लाख लुटले

सकाळवृत्तसेवा

नागपूर - सराफा व्यवसायिकाची पाच लाखांची रक्‍कम बॅंकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या नोकरांना दोघांनी लुटले. त्याच्याकडील दोन लाखांची रक्‍कम हिसकावून आरोपींनी पळ काढला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तहसील परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आकाश रोशन गुप्ता (वय २१, रा. इतवारी, तेलीपुरा) हा इतवारीतील भाजी मंडीत असलेल्या व्ही. गोल्ड ज्वेलर्स दुकानात कामाला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहाला दुकानातील ५ लाख रुपयांची रक्‍कम बॅंकेत जमा करण्यासाठी मालकाने आकाशला पाठवले. आकाशने पाच लाखांची रक्‍कम बॅगमध्ये ठेवली आणि दुचाकीने बॅंकेकडे निघाला. इतवारीतील टांगा स्टॅंडजवळ अज्ञात युवकाने आकाशच्या खांद्यावर थाप दिली. त्याने मागे वळून पाहिले असता, दुसऱ्या आरोपीने आकाशच्या दुचाकीवर अडकविलेल्या बॅगमधून दोन लाख रुपयांची रक्‍कम उडवली आणि पळून गेला. खांद्यावर थाप मारणाऱ्या युवकानेही ‘सॉरी’ म्हणून वेळ मारून नेत पळ काढला. बॅंकेत पोहोचल्यानंतर दुचाकीवरील बॅग काढली असता, त्यातील दोन लाख रुपये मिळून आले नाही. टांगा चौकात युवकाने लुटल्याचे लक्षात आले. आकाशने मालकाला हकीकत सांगितली. त्यानंतर तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोन लुटारूंवर गुन्हा दाखल केला.

सीसीटीव्हीवरून तपास
तहसील पोलिसांनी घटनाक्रमानुसार रस्त्यावरील आणि काही दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्या फुटेजवरून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. आरोपींची हातचलाखी किंवा लूटमार याचाही तपास पोलिस करीत आहेत.

पोलिसांना संशय
आकाश गुप्ता हा गेल्या काही वर्षांपासून व्ही. ज्वेलर्समध्ये कामाला होता. त्याच्याकडे नेहमीच लाखोंची रक्‍कम बॅंकेत जमा करण्यासाठी दिल्या जात होती. पाच लाख रुपयांपैकी चोरट्यांनी केवळ दोनच लाख रुपये काढून नेले. त्यामुळे आकाश याच्या सांगण्यावरही पोलिसांना संशय आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून ते स्पष्ट होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT