फ्लॅशबॅक - काटोलमध्ये चौदा वर्षांपूर्वी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अभिनेत्री श्रीदेवी.
फ्लॅशबॅक - काटोलमध्ये चौदा वर्षांपूर्वी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अभिनेत्री श्रीदेवी. 
विदर्भ

श्रीदेवींच्या उपस्थितीने ‘देखणा’ झाला सोहळा!

सकाळवृत्तसेवा

नागपूर - चार दशके भारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी बॉलीवूडची ‘चांदनी’ अर्थात श्रीदेवी यांनी आज अचानक एक्‍झिट घेतली. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरील असंख्य चाहते हळहळ व्यक्त करीत असताना काटोल येथील कार्यक्रमाच्या आठवणीही ताज्या झाल्या. चौदा वर्षांपूर्वी खास महिला खो-खोपटूंचा गौरव करण्यासाठी त्या काटोल येथे आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीने ‘देखणा’ झालेला हा सोहळा आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

काटोलमध्ये २००४ मध्ये विदर्भ युथचे अध्यक्ष अनुप खराडे यांनी महिलांची अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोलमध्ये ही स्पर्धा होत असल्याने पुरस्कार वितरण सोहळ्याला महिला सेलिब्रिटीला आमंत्रित करण्याचाच त्यांनी विचार केला. ‘मुंबईला एका कार्यक्रमात भेट झाल्यावर मी श्रीदेवींना काटोलला येण्याची विनंती केली. महिलांच्या खो-खो स्पर्धा असल्यामुळे त्यांनाही कौतुक वाटले आणि लगेच होकार दिला.

त्यांच्या उपस्थितीने आयोजक आणि खेळाडूंचाही उत्साह वाढला होता,’ अशी आठवण माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ‘सकाळ’ला सांगितली. १९९७ ते २००४ या कालावधीत त्यांनी फारसे चित्रपट केलेले नसले तरी रसिकांच्या मनावरील त्यांच्या अभिनयाचे गारूड कायम होते. त्यामुळेच काटोलमधील चाहत्यांनी अतिशय जल्लोषात स्वागत केले होते. मुंबईपासून साडेआठशे किलोमीटर लांब एका तालुक्‍याच्या ठिकाणी चाहत्यांचे आपल्यासाठी असलेले प्रेम बघून श्रीदेवीही भारवल्या होत्या, अशी आठवण विदर्भ युथचे अनुप खराडे सांगतात. बक्षीस वितरण सोहळ्यात भाषण करताना श्रीदेवी यांनी अनिल देशमुख यांच्या ‘हिरो’ पर्सनॅलिटीचे कौतुक करताना ‘आप गलतीसे पॉलिटिक्‍स में गये, आप को तो हमारे फिल्ड में होना था’ असा डायलॉगही मारला होता.

मराठीत काम करण्याची इच्छा
या कार्यक्रमानंतर श्रीदेवी यांनी काटोल व नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला होता. मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. श्रीदेवी यांनी, ‘मराठीत काम करण्याची खूप इच्छा आहे. योग्य संधी मिळाल्यास नक्कीच काम करायला आवडेल’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मराठी चित्रपटांमध्ये तर त्यांना कामाची संधी मिळाली नाही; पण काही वर्षांपूर्वी ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात मराठमोळ्या आईची भूमिका साकारून त्यांनी आपली इच्छा पूर्ण करून घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

SCROLL FOR NEXT