marathi news vidarbha akola standing committee election politics
marathi news vidarbha akola standing committee election politics  
विदर्भ

भाजपचे धक्कातंत्र; लोकसभेपूर्वी वापरले एससी कार्ड

सकाळवृत्तसेवा

अकोला - आगामी जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून भाजपने महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनपेक्षित निर्णय घेवून स्थायी समिती सभापतीपद विशाल श्रावण इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची अनाैपचारिकता मंगळवारी पूर्ण केली जाईल.

स्थायी समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन सभापती निवडण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. या पदाकरिता मागील अनेक दिवसंपासून भारतीय जनता पक्षामध्ये चढाओढ सुरू होती. त्यातून अनेकांच्या नावाची चर्चाही सुरू झाली होती. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी विशाल श्रावण इंगळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे त्यांनी तीन उमेदवारी अर्ज नगरसचिव अनिल बिडवे यांच्याकडे सोमवारी दाखल केले. आता त्यांच्या निवडीची केवळ आैपचारिकता शिल्लक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, गटनेता राहुल देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, सभागृहनेत्या गितांजली शेगोकार, नगरसेवक अनिल गरड, विनोद मापारी, सुभाष खंडारे, दीप मनवानी, तुषार भिरड, नगरसेविका नंदाताई पाटील, आम्रपाली उपरवट, आरती घोघलिया, रंजना विंचनकर, अर्चना मसने, जानव्ही डोंगरे, शारदा ढोरे व सर्व भाजपा नगरसेवक, नगरसेविकांची उपस्थिती होती. विशाल इंगळे यांच्या नावाची मंगळवारी आैचारिक घोषणा झाल्यानंतर ते मावळते सभापती बाळ टाले यांची जागा घेतील.

मसने, क्षीरसागर यांची नावे पडली मागे
भाजपकडून सभापतीपदासाठी अर्चना मसने आणि सुनील क्षीरसागर यांच्या नावाबाबत जोरदार चर्चा होती. रविवारी सायंकाळी तर क्षीरसागर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचीही चर्चा होती. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना मात्र भाजपने विशाल इंगळे यांना अर्ज भरण्याची सूचना करून सर्वांनाच धक्का दिला.

रात्रीचा निर्णय सकाळी बदलला
भाजपकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी सुनील क्षीरसागर यांच्या नावावर पक्षाने रविवारी रात्री शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी एका भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नेत्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दलित मतांचा फायदा व्हावा म्हणून विशाल इंगळे यांना सभापतीपद देण्याचा निर्णय घेण्यात आली.

महापाैरांची खेळी आमदारावर भारी
स्थायी समिती सभापतीपदावर आमदार रणधीर सावरकर यांच्या गोटातील एकमेव उमेदवार म्हणून सुनील क्षीरसागर यांचे नाव निश्‍चित झाले होते. मात्र, पूर्व झोनमध्ये हद्दवाढीतील भागाला प्रतिनिधित्व देणे, बाैद्ध धर्माचे मतं जिल्हा परिषद निवडणुकीत मिळावी, ही महापाैरांची खेळी आमदारांवर भारी पडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

पहिल्याच टर्ममध्ये सभापतीपदाची लॉटरी
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे यांनी मकहापालिका निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला हाेता. त्यानंतर त्यांचा मुलगा विशाल इंगळे यांना प्रभाग १४ मधून भाजपची उमेदवारी देण्यात आली. प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग होता. पहिल्या प्रयत्नातच ते नगरसेवक म्हणून निवडून आलेत. त्यांना पहिल्याच वर्षी भाजपने स्थायी समिती सदस्य म्हणून संधी दिली. एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर लॉटरीने निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये त्यांना क्रम लागला नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या वर्षीही समितीत कायम राहता आले. अखेर त्यांच्याकडे स्थायी समिती सभापतीपदही सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT