truck
truck 
विदर्भ

रेती भरलेला ट्रक तहसील कार्यालय समोरून पसार

भुपेश बारंगे

कारंजा (घा) : राष्ट्रीय महामार्ग 6 वरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालतात. त्यात ओव्हरलोड वाहन असते. तसाच शुक्रवारी 4 वाजताच्या दरम्यान अवैध रेती भरून येत असलेला ट्रक कारंजा तहसील कार्यालयाच्या दोन अधिकारी पकडला. 

सौंसर येथून अमरावतीला अवैध रेती घेऊन जात असलेला ट्रक क्र. महा 19 झेड 4063 कारंजा तहसील गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर तहसील विभागच्या दोन नायब तहसिलदारानी पांडे पेट्रोल पंप जवळ ट्रकला थांबवून विचारणा केली. त्यात रेती असल्याची माहिती सांगितले. त्यानंतर हा ट्रक तहसील कार्यालयाच्यासमोर आणण्यात आला. या ट्रकला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला नाही किंवा या ट्रकमध्ये किती ब्रास रेती आहे याची माहिती तहसील विभागाने घेतली नाही. त्या ट्रकला तहसील कार्यालयासमोर उभा ठेवण्यात आला. या ट्रकवर कारवाई न करताच अर्थकारण घेण्यासाठी हा प्रकरण संशयास्पद दिसत आहे. या ट्रकमध्ये जवळपास एक हजार फूटांच्यावर रेती साठा त्यात भरती करण्यात आला होता. जवळपास या ट्रक मालकाला तीन लाखाच्या दंड भरावा लागणार होता. मात्र त्याची सेटिंग करण्यासाठी कारंजा येथील स्थानिक या व्यवसायातील दलाल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तहसील विभागाकडून दडपण्याचा प्रकार घडत होते. मात्र सकाळने या कारवाई बाबत चोवीस तास उलटल्यानंतर नायब तहसीलदार सुनील मुनाळे यांना विचारले त्यांनी या प्रकरणाची माहिती तहसीलदार देणार असून वेळ मारून दिला. मात्र त्यापूर्वी हा ट्रक पसार झाला होता की कारंजा तहसील विभागाने सोडून दिला, हा प्रश्न आहे. तहसील विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा ट्रक अर्थ कारण घेऊन सोडून दिला असल्याची चर्चा शहरात आहे.

सकाळने माहिती विचारताच तहसील कार्यालयात उडाली तारांबळ रेती भरून मिळालेला ट्रकवर 12 तास कारवाई झाली नाही. त्यानंतर हा ट्रक पसार झाला याची माहिती सकाळ ने तहसील कार्यालयात विचारणा केली. त्यानंतर तहसील विभागाला जाग आली. नंतर पोलिस ठाण्यात ट्रक पसार झाला म्हणून पत्र पाठवण्यात आले. या प्रकरणात तहसील कार्यालयातून अर्थ कारण घेऊन दडपण्याचा प्रकार करत असल्याने येथील अधिकारी महिन्याकाठी मोठा अर्थ व्यवहार करत असल्याच्या या प्रकरणात दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT