file photo
file photo 
विदर्भ

सावकाराच्या तगाद्याने दाम्पत्याची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती) : अवैध सावकाराच्या तगाद्यामुळे पती-पत्नीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिंचारगव्हाण पुनर्वसन येथे घडली. यात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी अत्यवस्थ आहे. परिसरात अवैध सावकारीमुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत.
चिंचरगव्हाण येथे सोपान गंगाधर शेलोटे (38) व वंदना सोपान शेलोटे (32) या पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी (ता. 25) दोघांनीही लग्नसमारंभात जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. मात्र, गुरुवारी ते परतले नाही. सुरसुरळी येथे त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आले. शनिवारी (ता. 27) मध्यरात्री सोपान शेलोटे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला; तर पत्नी वंदना यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे. सोपान यांच्यावर अवैध सावकारी कर्ज आहे. पैशासाठी सावकाराने तगादा लावल्याने सोपान व वंदना यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. सोपान हे घरातील कर्ते होते. त्यांच्या जाण्याने वृद्ध आईवडील व दोन मुले पोरकी झाली आहेत. सोपान यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज असल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली.
अवैध सावकारी फोफावली
राजुराबाजार मुख्य बाजारपेठ आहे. येथे अवैध सावकारीचा धंदा फोफावला आहे. गरजूंना हेरून हे सावकार त्यांना आठवड्याचे 10 टक्के या व्याजदराने पतपुरवठा करतात व त्यांच्याकडून आठवड्याच्या व्याजाची रक्कम वसूल करतात. ठरलेली रक्कम मिळाली नाही, तर ते संबंधितास मारहाण, धमकी, बायको मुलांचा घातपात करण्याची धमकीही देतात. त्यांची दहशत असल्याने सामान्य गोरगरीब त्यांच्याविरुद्ध तक्रार करीत नाहीत, असे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT