Married woman commits suicide by drinking poison
Married woman commits suicide by drinking poison 
विदर्भ

ह्रदयद्रावक... भर चौकात विष घेऊन विवाहितेची आत्महत्या, पहिले दिली पोलिसांत तक्रार

संतोष ताकपिरे

अमरावती  ः दोन मुलींसह पतीला सोडून निघून गेलेल्या महिलेने चपराशीपुरा येथील सुंदरलाल चौकात विष प्राशन केले. उपचारादरम्यान या महिलेचा इर्विन रुग्णालयात मृत्यू झाला. पूजा असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

सदर महिलेचे दहा वर्षांपूर्वी अमरावतीच्या महादेवखोरी परिसरातील व्यक्तीसोबत लग्न झाले असून, पती आरोग्यसेवक आहे. ऑक्‍टोबर महिन्यात सदर महिला दोन्ही लहान मुलींसह निघून गेली होती. त्यानंतर पित्याने तिची समजूत काढण्यासाठी माहेरी नेले. पतीसह तिच्या सासरच्या मंडळींसोबत चर्चा करून त्यांच्यात समझोता घडवून आणला. त्यानंतर तिला पुन्हा दोन्ही मुलींसह वडिलांनीच अमरावतीत पतीकडे आणून सोडले. 

काही दिवस आनंदात गेल्यानंतर 17 ऑक्‍टोबर रोजी ती पुन्हा घरून मुलींना सोडून निघून गेली. तिच्या दिराने हरविल्याची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविली होती. मंगळवारी (ता. 20) ही महिला परत अमरावतीत आली. तिने सकाळी फ्रेजरपुरा ठाणे गाठून पती, सासू-सासरे व दीर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्या लोकांना चौकशीकरिता ठाण्यात बोलविले. 

दिराने वहिनीची समजूत काढली, असे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर महिलेच्या पित्यानेही भेटीसाठी अमरावतीत येण्याचे आश्‍वासन दिले. परंतु तिने ठाण्यातून निघून जाऊन सुंदरलाल चौकातील एका हॉटेलसमोर विषारी द्रव्य प्राशन केले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेस उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


नातेवाइकांनी काढली समजूत
अधिकारी, नातेवाइकांनी तिची समजूत काढली. समूपदेशनही केले. ठाण्यातून निघून गेल्यावर रस्त्यातच विष घेतल्यामुळे तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.
-पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे. 


युवकास दहा वर्षे सश्रम कारावास

अमरावती  : जिल्ह्यातील कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हासत्र न्यायालयाने बुधवारी (ता. 21) आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.  न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. ऋषिकेश ईश्‍वर नागले (मून) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असल्याचे सहायक सरकारी अभियोक्ता सोनाली क्षीरसागर यांनी सांगितले. 3 मे 2019 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिकवणी वर्ग सुरू झाला किंवा नाही, याबाबत शहानिशा करण्यासाठी घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी परतलीच नव्हती. कुटुंबीयांनी पीडितेचा शोध घेतला. अखेर 5 मे 2029 रोजी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी ऋषिकेशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. 7 मे 2020 रोजी पीडिता परतली. वैद्यकीय तपासणी केल्या गेली. त्यात ऋषिकेशने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केल्याची बाब पुढे आली.  


संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT