file photo
file photo 
विदर्भ

एमबीए'चे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : एमबीएच्या गुणवत्ता यादीतील घोळ निदर्शनास येताच सीईटी सेलद्वारे तीन दिवसांनंतर प्रवेश प्रक्रियेतील दुसरी फेरी थांबविली आहे. 24 जुलैपासूनच विद्यार्थ्यांना प्रवेशाचे ऑप्शन भरता येत नसल्याची तक्रार होती. मात्र, आता अधिकृतरीत्या ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आता या प्रकरणात न्यायालयाकडून निर्णय यायचा असल्याने प्रक्रियेवरील अनिश्‍चितता कायम आहे.
एमबीएमधील घोळ लक्षात येताच, गुणवत्ता यादीची तपासणी करीत, त्यात दोषी असलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश सीईटी सेलद्वारे देण्यात आले. याशिवाय दुसरी फेरी थांबवली होती. सीईटी सेलच्या 187 बनावट गुणवत्ता देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला. आता या रिक्त जागांवर गुणवत्ता यादीत त्यांच्या खालोखाल असणारे विद्यार्थी दावा करणार आहेत. बनावट प्रवेशामुळे अन्य विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेश नाकारून दुसऱ्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. परिणामी असे विद्यार्थी आता पहिल्या पसंतीच्या 187 जागांवर दावा करणार आहेत. मात्र, सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात न्यायालयातून कुठलाच निर्णय आला नसल्याने प्रक्रिया "जैसे थे' असल्याची माहिती संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी दिली. निर्णयाची प्रतीक्षा असून तो येताच, लवकरात लवकर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर प्रक्रियेचे भविष्य अवलंबून आहे. या घोळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून, प्रक्रियेस बराच उशीर होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे. शिवाय महाविद्यालयेही त्रस्त आहेत.
............
प्रवेश घटण्याची शक्‍यता
यंदा एमबीएच्या सीईटीमध्ये बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले. मात्र, प्रक्रिया सुरू करण्यात सीईटी सेलने उशीर केल्याने निम्म्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली. मात्र, आता हा घोळ उद्‌भवल्याने पुन्हा प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश घटण्याची शक्‍यता आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT