File photo
File photo 
विदर्भ

चंद्रपुरात एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 15) दुपारच्या सुमारास घडली. रोहित पटेल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रोहित हा झांसी येथील ललितपूरचा रहिवासी होता. वैद्यकीय महाविद्यालयाच्या 2015 च्या पहिल्या तुकडीचा तो विद्यार्थी होता. यावर्षी तो अंतिम वर्षात होता. डिसेंबर महिन्यात त्याची परीक्षा होणार होती. रविवारी सुटीचा दिवस होता. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी निवांत होते. दुपारच्या सुमारास त्याने आपल्या मित्रांसोबत वसतिगृहाला लागूनच असलेल्या खानावळीत जेवण केले. त्यानंतर तो वसतिगृहातील आपल्या खोलीवर परतला. त्याने आपल्या कुटुंबीयांशी फोनद्वारे संवादही साधला. त्यानंतर तो वसतिगृहातील इमारतीच्या छतावर गेला. तेथून त्याने खाली उडी घेतली. हा प्रकार वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. महाविद्यालय व्यवस्थापन आणि रामनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले. त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT