छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

कुख्यात पराळे टोळीवर मोक्का

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वाठोडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार गोपी पराळेसह त्याच्या टोळीतील एकूण सहा जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीविरुद्ध खून, दरोडा, गैर कायद्याची मंडळी जमविणे, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, दुखापत, चोरीसह एकूण 24 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून परिसरात चांगलीच दहशत आहे.
गोपी ऊर्फ गोपाल पुरुषोत्तम पराळे (28) रा. श्रीरामनगर, वाठोडा ले-आउट, खरबी, वैभव तन्नेलवार (28) रा. सद्‌भावनानगर, हसनबाग पोलिस चौकीसमोर, नितीन देशमुख (28) रा. दर्शन कॉलनी, किशोर ठवरे (27) रा. चकोले वाडी, खरबी, राहुल ऊर्फ भैरव मेंढेकर (25) रा. साईबाबानगर, खरबी अशी आरोपींची नावे आहेत. टोळीतील अन्य एक आरोपी फरार आहे. टोळीच्या सहा सदस्यांनी 30 ऑगस्ट रोजी रात्री सर्वश्रीनगरातील रमश्री बार ऍण्ड रेस्टॉरेंटमध्ये तोडफोड केली होती. जाताना बळजबरीने काउंटरच्या ड्रावरमधून सुमारे 9 हजार रुपये लुटून नेले होते. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याच दिवशी गोपी, वैभव आणि नितीनला अटक केली. तर दुसऱ्याच दिवशी भैरव व किशोरला अटक केली होती. या टोळकडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्याविरुद्ध नंदनवन, सक्करदरा, कन्हान ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीसुद्धा गोपी व त्याच्या साथीदारांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार ताकीद देऊनही टोळी गुन्हेगारीत सक्रिय असल्याने अखेर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. चालू वर्षात 38 गुडांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून 9 गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT