file photo
file photo 
विदर्भ

नरखेडमध्ये मायलेकाचा ठेचून खून

सकाळ वृत्तसेवा

नरखेडमध्ये मायलेकाचा ठेचून खून
जलालखेडा/नरखेड (जि.नागपूर) : चार वर्षीय चिमुकल्यासह त्याच्या आईचा बत्याने ठचून खून केल्याची घटना नरखेड येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. प्रियंका दिनेश शाहू (वय 25) व अंशूल (वय 4) अशी मृताची नावे आहेत. गणपती असूनही शांतता असल्याने शेजारच्यांनी पाहणी केल्यावर ही घटना समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नरखेड येथील स्वामी विवेकानंद चौकाजवळ भांडेखारी (वार्ड क्र. 8) नारायण वानखेडे यांच्या घरी दिनेश सीयाराम शाहू (रा. दरीयापूर, जि. फतेहपूर, बिहार) हे पत्नी व चारवर्षीय मुलासह भाड्याने राहत होते. त्यांचा आठवडी बाजारात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी दिनेश यांच्याकडे बिहार राज्यातूनच रवी नावाच्या व्यक्तीला मदतीसाठी बोलावून घेतले होते तो देखील दिनेशच्या कुटुंबासह राहत होता. दिनेशच्या घरी गणपती असल्याने रात्र होऊनही घरात अंधार असल्याचे शेजारच्यांनी दरवाजा ठोकला. प्रतिसाद मिळत नसल्याने धक्का मारल्यावर दरवाज उघडा असल्याचे लक्षात आले. घरातील आतल्या खोलीत प्रियंका व चिमुकल्या अंशूलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. जवळच रक्ताने माखलेला बत्ता पडून असल्याने खून बत्याने केल्याचे समोर आले. प्रियंकाची ओढणी दुसऱ्या खोलीत असल्याने मारेकऱ्यासोबत झालेल्या झटापटीत ती पडली असावी असा संशय पोलिसांना आहे. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. नरखेड पोलिसांना माहिती मिळताचे ठाणेदार मल्लीकार्जून इंगळे ताफ्यासह दाखल झाले. रात्री आठ वाजता बाजारातून परत घरी आल्यावर या पत्नी व मुलाचा खून झाल्याचे दिनेशला ही माहिती मिळाली. तर त्याच्यासोबत राहणारा रवी देखील बेपत्ता आहे. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून पती दिनेशला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात असून रवीचा देखील शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी भेट दिली.
खूनाचे कारण अज्ञात
दिनेशने दिलेल्या बयानानुसार, शनिवारी दिनेश एकटाच बाजारात गेला होता. त्याच्यासोबत काम करणारा रवी गावी परत जाणार होता. सकाळी बाजारात जाण्यापूर्वी पत्नी प्रियंकाला रवीचा हिशेब करून दे असे सांगितले होते. रवीच्या नावाशिवाय दिनेशला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. यामुळे मायलेकाचा खून कोणत्या कारणातून झाला असावा याबद्दलही तर्क वितर्क लावले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT