Minister Yashomati Thakur visits Kovid Ward, inquires about patients
Minister Yashomati Thakur visits Kovid Ward, inquires about patients 
विदर्भ

(Video) या मंत्र्यांनी दाखवली हिंमत, कोवीड वॉर्डात केली रुग्णांची विचारपूस

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रुग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सायंकाळी रुग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला.

जिल्हा कोविड रुग्णालयाबाबत तक्रारी होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रुग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील स्थापित कोविड रुग्णालयाला भेट दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रुग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांची टीम अहोरात्र जीवाची पर्वा न करता काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रुग्णसेवा देत असते. आज आपण स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्यात पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाल्या, अजूनही लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रकार कुणीही करता कामा नये. सर्वांनी एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 212 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातले 120 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

याच रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहेत. कोविड रुग्णालयातील प्रत्येक दाखल व्यक्तीला भेटून विचारपूस केली. प्रत्येक वॉर्डाला भेट दिली. रुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉक्‍टर व आरोग्य यंत्रणा रूग्णांसाठी व समाजासाठी देवदूत ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.
 

डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांचा सेवाभाव उत्कृष्ट
कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्‍टर व इतर कर्मचाऱ्यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची स्वत: विचारपूस केली. मिळणाऱ्या सेवेबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्‍त केले. डॉ. रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्‍टर-कर्मचारी अत्यंत चांगले काम करत असल्याची माहिती रुग्णांनी दिली. या काळात सर्वांनी डॉक्‍टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्‍यक आहे.
यशोमती ठाकूर, पालकमंत्री अमरावती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT