minor boy stole money online from the mother's account
minor boy stole money online from the mother's account 
विदर्भ

मुलाच्या पहिल्या चुकीला माफी, मात्र दुसऱ्यांदा पालकांनी घेतला हा कठोर निर्णय

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : आई-वडील दोघेही नोकरीत असल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला त्यांनी ऍण्ड्रॉइड मोबाईल घेऊन दिला. मुलाने मोबाईलवरून ऑनलाइन बॅंकिंग व्यवहार सुरू केले. अन्‌ आईच्याच बॅंक खात्यामधून टप्प्याटप्प्याने 17 हजार रुपये काढून घेतले. पहिल्यांदा मुलाची चूक माफ करणाऱ्या पालकांनी दुसऱ्यांदा पोलिसांत जाऊन त्याला धडा शिकविल्याची घटना शहरात घडली.

वडील जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यांसोबत काम करतात तर आई शासकीय सेवेत कार्यरत आहे. अल्पवयीन मुलाच्या आईचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेत बचत खाते होते. घरी कुणी नसताना या अल्पवयीन मुलाने आईच्या बॅंक खात्यामधून मोबाईल बॅंकिंग व्यवहार केला होता. त्यावेळी पित्याने तक्रार दाखल केली, परंतु मुलाच्या भविष्याचा विचार करून पित्याने ठाण्यात तक्रार नोंदवूनदेखील गुन्हा दाखल करण्याचे टाळले.

पहिल्यांदा पित्याने ठाणेदाराकडून केवळ मुलाला समज द्यावी, एवढीच विनंती केली होती. काही दिवस मुलगा बऱ्यापैकी राहिला. परंतु, पैसे उडविण्याचा विचार पुन्हा त्याच्या मनात आला. आई-वडील दोघेही घरी नसताना त्याने तीन ते चार वेळा स्वत:जवळच्या मोबाईलवरून ऑनलाइन बॅंकिंग व्यवहार करून टप्प्याटप्प्याने 30 हजार रुपये उडविले.

ही बाब काही दिवसांनी आईच्या लक्षात आली. त्यानंतर मुलाची एकदा समजूत काढल्यानंतर त्याचे वर्तन सुधारत नसल्याचे बघून वैतागलेल्या पित्याने गुरुवारी (ता. 28) अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी त्या मुलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
 

तीच चूक केल्याने गुन्हा दाखल
पहिल्यांदा पैसे काढल्यावर झालेल्या तक्रारीतून वर्तन सुधारेल हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मुलाला माफ केले. परंतु, मुलाने पुन्हा तशीच चूक केल्याने पालकांनी गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

Amit Shah Fake Video Case : रेवंथ रेड्डींचे वकील दिल्ली पोलिसांसमोर हजर; दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT