mla bacchu kadu says public will teach lesson in lok sabha election
mla bacchu kadu says public will teach lesson in lok sabha election Sakal
विदर्भ

Lok Sabha Election : निवडणुकीत जनताच धडा शिकवणार - आमदार बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एकीकडे शेतकरी, शेतमजूर, सामान्यांचे प्रश्न कायम असताना सत्तेच्या मदतीने दबावाचे राजकारण करणाऱ्यांना जनता निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, आमदार बच्चू कडू यांनी आज नेहरू मैदान येथील जाहीर सभेत केले.

‘प्रहार’चे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारार्थ शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर नेहरू मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. बच्चू कडू म्हणाले, ‘‘आम्हाला सभेची असलेली परवानगी रद्द करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला सायन्सकोर मैदानावर प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली.

हा प्रकार दडपशाहीचा असून सर्वसामान्य जनता त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर कापूस व तुरीचे भाव खाली आले आहेत. त्यामध्ये शेतकरी भरडून निघत आहे. ’’

रक्तदानातून निषेध करणार

सायन्सकोर मैदानावर प्रहारला सभेची परवानगी असतानाही प्रशासनाने सभा घेऊ न दिल्याच्या विरोधात आपण स्वतः १०० कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करणार असल्याची घोषणा कडू यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT