file photo
file photo 
विदर्भ

आमदार-नगरसेवक भिडले 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : बडनेरा येथील वृद्धाश्रमामध्ये दिवाळीच्या दिवशी आयोजित समारंभस्थळी आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक दिनेश बूब समोरासमोर उभे ठाकल्याने वाद होऊन हाणामारी झाली. दोघांचे समर्थकही आपसांत भिडले. परस्परांवर खुर्च्या फेकल्यामुळे राडा झाला. 
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी (ता. 27) काही वर्षांपासून विविध राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक संस्थांच्या वतीने येथील वृद्धांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी समारंभाचे आयोजन केल्या जाते. आमदार राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटना आणि शिवसेनेचे दिनेश बूब यांच्या न्यू. आझाद मंडळाच्या वतीनेही समारंभाचे आयोजन करून मिठाई आणि काही भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. समारंभाच्या ठिकाणी दोन्ही नेत्यांसह त्यांचे समर्थकसुद्धा हजर होते. राणा आणि बूब हे दोघे समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान महिला खासदारांबद्दल काही अपशब्द काढल्याचा आरोप राणा यांनी केला. त्यावरून सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक, शिवीगाळ आणि नंतर झटापट झाली. नेतेच आपसांत भिडत असल्याचे बघून त्याठिकाणी हजर समर्थकांनी एकमेकांचा प्रतिकार सुरू केला. समर्थकांनी हॉलमधील खुर्च्या उचलून एकमेकांच्या दिशेने भिरकावल्यामुळे वातावरण अधिकच तापले. घटनेच्या वेळी उपस्थित काही लोकांनी नंतर दोघांना एकमेकांपासून दूर करून त्यांची समजूत काढली. या घटनेनंतर राजापेठ आणि बडनेरा ठाण्याचे पोलिस वृद्धाश्रम परिसरात दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर पुढील कार्यक्रम शांततेत सुरू झाला. दोन्ही गटांनी बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे टाळले. 
 
महिलांचा अपमान सहन करणार नाही 
वृद्धाश्रमातील मंडळी आपल्या आईवडिलांप्रमाणे आहे. ज्या कारणामुळे हा प्रकार घडला, त्याबद्दल वृद्धांची माफी मागतो. घडलेल्या प्रकारानंतर त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करूनच तेथून परतलो. परंतु, जो कुणी महिलांचा अपमान करेल, तो सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. 
 
कुणाचाही अपमान केला नाही 
आमदारांकडून महिलांचा अपमान केल्याचा जो कांगावा केल्या गेला तो चुकीचा आहे. कुणाबद्दलही अपशब्द काढला नाही. सामाजिक उपक्रमासाठी वृद्धाश्रमात गेलो असता, असा प्रकार घडल्याबद्दल ज्यांना मनस्ताप झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे दिनेश बूब यांनी स्पष्ट केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT