अमरावती - व्यासपीठावर उपस्थित केशवचंद यादव व अन्य मान्यवर.
अमरावती - व्यासपीठावर उपस्थित केशवचंद यादव व अन्य मान्यवर. 
विदर्भ

मोदींनी देशवासीयांचा विश्‍वासघात केला

सकाळवृत्तसेवा

अमरावती - दोन कोटी रोजगार व प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये,  शेतमालाला भाव यापैकी एकही आश्‍वासन भाजप सरकार पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे मोदी सरकारने देशवासीयांचा विश्‍वासघात केला, असा आरोप अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी केला. 

युवक काँग्रेसने कन्याकुमारी ते काश्‍मीरपर्यंत काढलेल्या युवा क्रांती यात्रेचे आज, बुधवारी  शहरात आगमन झाले. यावेळी विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवास, राष्ट्रीय सचिव भय्या पवार, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी, माजी आमदार रावसाहेब शेखावत, किशोर बोरकर, बबलू शेखावत, विलास इंगोले, पुष्पा बोंडे, विक्रम ठाकरे, परीक्षित जगताप उपस्थित होते. 

सत्यजित तांबे म्हणाले की, देशवासीयांनी भाजप सरकारला निवडून दिले. मात्र, या सरकारने सर्वांचा भ्रमनिरास केला. त्यामुळे आगामी २०१९ च्या निवडणुकीत या सरकारला उलथवून टाकण्याकरिता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. रावसाहेब शेखावत यांनी राफेल हा मोठा घोटाळा असल्याचे सांगितले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी शहीद मुन्ना शेलूकर यांना श्रद्धांजली वाहिली. 

कार्यक्रमाचे संचालन शहजाद यांनी, तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी केले. आभार परीक्षित जगताप यांनी मानले. कार्यक्रमाला सागर देशमुख, समीर जवंजाळ, संकेत कुलट, रितेश पांडव, रोहित देशमुख, संदीप शेंडे, रवी रायबाले, अश्‍विनी आसर, नीलेश गुहे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

काँग्रेसला हवा मोर्शी मतदारसंघ
विक्रम ठाकरे यांचे काम अत्यंत चांगले असून मोर्शी-वरुड मतदारसंघात राष्ट्रवादी सतत पराभूत होत आहे. त्यामुळे ठाकरे यांना संधी दिली पाहिजे, असेही सूचक विधान सत्यजित तांबे यांनी केले. 

शिक्षणमंत्र्यांचा निषेध 
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांसोबत केलेल्या वर्तनाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याविरुद्ध घोषणाबाजी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT