mohan bhagwat on Jahangirpuri violence in amravati nagpur sakal
विदर्भ

हिंसाप्रिय समाज आता शेवटच्या घटका मोजतोय- सरसंघचालक मोहन भागवत

देशातल्या विविध भागांमध्ये होणाऱ्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचं हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंसेने कोणालाही काही फायदा होत नाही. हिंसाप्रिय समाज आता शेवटच्या घटका मोत आहे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल केलं. अमरावतीमधील नव्या संत कंवररामधाम (पीठाचे) येथे आयोजित गद्दीनशिनी समारोहात ते बोलत होते. सिंधी समाजाचे विश्व आराध्य संत अमर शहीद संत कंवरराम साहिबजी यांच्या पावन गादीवर साईजींचे वंशज साई राजेशलाल साहीबजी यांचा गद्दीनशिनी समारोह येथे आयोजित करण्यात आला होता.

अमरावतीतल्या या कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले की, हिंसेने कोणाचाच फायदा होत नाही. ज्या समाजाला हिंसा प्रिय आहे तो समाज आता शेवटच्या घटका मोजत आहे. आपल्याला कायम अहिंसक आणि शांतिप्रिय राहणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्या समुदायांचा एकत्र आणणं आणि मानवतेचं रक्षण करणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच प्राथमिकतेने हे करणं गरजेचं आहे.

भानखेडा मार्गावर मुख्य समारंभाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. समारंभाला प्रमुख वक्ते म्हणून सरसंघचालक उपस्थित होते. व्यासपीठावर सिंधी समाजातील प्रमुख संत मंडळींसह जगद्गुरू शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद, अंजनगावसुर्जीच्या देवनाथ पीठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज, इंदूरचे खासदार शंकरलाल लालवानी, विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत हरताळकर, ईश्वरीदेवी नेहलानी, परमानंद खट्टर, प्रसिद्ध उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.

सिंधी समाजातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर संत, महात्म्यांनी एकाच व्यासपीठावर येणे ही बाब समाजामध्ये नवीन ऊर्जा देणारी ठरेल, असा विश्वास सरसंघचालक डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. सिंधी भाषेच्या प्रगतीसाठी एक विश्वविद्यालय व्हावे, या मागणीचे त्यांनी कौतुक केले. एखादा संकल्प जर समाजहिताचा, धर्महिताचा असेल तर त्याच्या पूर्ततेसाठी ईश्वराचाच आशीर्वाद मिळतो. संत कंवरराम हे प्रत्येक मनुष्यात ईश्वराचे रूप बघत होते. संत परोपकारासाठी जन्माला येतात. अशा संतांची रक्षा करण्याची जबाबदारी संतांनी पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

समाजाचे संघटित बळ चांगल्या संकल्पपूर्तीसाठी फायदेशीर ठरू शकते, असेही ते म्हणाले. सिंधी भाषेच्या उत्थानासाठी विश्वविद्यालय व्हावे, यासाठी कुणाचाच विरोध नाही. भाषेच्या प्रगतीसाठी स्वत:च्या घरापासून प्रारंभ होणे गरजेचे आहे. घरात स्वभाषेचे अनुसरण महत्त्वाचे झाले आहे. संत अहिंसा, सद्भावनेच्या आधारावर चालण्यास शिकवितात, त्यामुळेच धर्म आज जिवंत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवरांची भाषणे झाली.

देश-विदेशातील प्रतिनिधी

अमरावतीत पहिल्यांदाच आयोजित एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी देश-विदेशातील शेकडो प्रतिनिधी दाखल झाले होते. सर्व प्रतिनिधींसाठी अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT