abc
abc 
विदर्भ

शेती खरेदी करण्यासाठी पैसे काढण्यास गेला बँकेत; बघतो तर काय? सरकली पायाखालची जमीन 

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : एका मेेंढपाळाने मेंढया विकल्या अनं तिन टप्प्यात आठ लाख चाळीस हजार रूपये बॅक आॅफ इंडियाच्या आपल्या खात्यात जमा केले. काही दिवसानंतर त्याने गावातील शेती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रक्कम काढण्यासाठी तो बॅकेत गेला.अन खाते बघतो तर काय त्याच्या खात्यातील चक्क साडेतीन लाख रूपयाची रक्कम कमी होती.

हे बघून त्याला धक्काच बसला.आता याप्रकणाची चैकशी करून रक्कम परत करण्यासोबत बॅक व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची मागणी पोलीसात दिलेल्या तक्रारीतून केली आहे.राष्ट्रीयकृत बॅकातून जर असे प्रकार होत असतील तर कसे होणार हा प्रश्न आता समोर येत आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे मोठया प्रमाणावर धनगर बांधव मेंढपाळाचा व्यवसाय करतात.मल्ला बोरलावार यांचा देखिल मेंढपाळाचा व्यवसाय आहे.त्यांनी आपल्या मेंढया विकून तिन टप्प्यात भंगाराम तळोधी येथील बॅक आॅफ इंडिया च्या आपल्या खात्यात आठ लाख चाळीस हजार रूपये जमा केले.बॅकेत असलेल्या रक्कमेचा शेतीची जागा घेउन सुदपयोग करण्याचे बोरलावार याने ठरविले.शेती बघितली,सौदाही झाला.

यानंतर आपली रक्कम काढण्यासाठी बोरलावार बॅकेत गेले.अन त्यांना धक्काच बसला.कारण त्याच्या खात्यातील जवळपास साडेतीन लाख रूपयाची रक्कम कमी होती.एवढी मोठी रक्कम गायब झाल्याने त्यांनी बॅक व्यवस्थापकाकडे विचारणा केली.पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.मल्ला बोरलावार हे अशिक्षीत आहेत.त्यामुळे गांेधळलेल्या अवस्थेत त्यांनी गावातील कार्यकर्ते मारोती अम्मावार यांची भेट घेतली.

त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. शेवटी अम्मावार यांनी पुढाकार घेत याप्रकरणाची तक्रार गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.बॅक आॅफ इंडिया च्या झोनल विभागाकडे तक्रार करण्यात आली.बॅक आॅफ इंडिया सारख्या राष्ट्रीयकृत बॅकेकडून असा मोठा घोळ समोर आल्याने बॅकेवर विश्वास तरी ठेवायचा असा असा प्रश्न बोरलावार यांनी विचारला आहे.याप्रकरणाची योग्य चैकशी करून रक्कम परत दयावी व व्यवस्थापकावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बॅकेत ठेवलेली रक्कम परस्पर गायब होणे हि अतिशय गंभीर बाब आहे.भंगाराम तळोधीच्या  बॅक आॅफ इंडिया च्या शाख्ेात असे अनेक प्रकार घडले आहेंत.या संपुर्ण प्रकरणाची चैकशी करून दोषींवर कार्यवाही करावी.याप्रकाराकडे बॅकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दयावे.  
मारोती अम्मावार,
माजी उपसरंपच,भं. तळोधी

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT