file photo
file photo 
विदर्भ

वारकऱ्यांच्या सेवेत साडेतीन हजार अतिरिक्त बसेस

सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एसटी महामंडळ प्रशासन श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेकरिता सज्ज झाले आहे. नियमित फेऱ्याव्यतिरिक्त 3 हजार 724 अतिरिक्त बसेसचा ताफा भाविकांच्या सेवेत राहणार आहे. यात पहिल्यांदा नव्याने बांधणी केलेल्या माइल्ड स्टीलच्या एक हजार 200 आकर्षक बसेस असणार आहेत.
श्रीक्षेत्र पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला फार महत्त्व असते. भाविकांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे, पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घडवून सुखरूप पणे घरी आणून सोडण्याची महत्त्वाची जबाबदारी एसटी महामंडळाची असते. यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेकरिता एसटी महामंडळाने नियोजित फेऱ्याव्यतिरिक्त 3 हजार 724 ज्यादा बसेस भाविक प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाचे सुमारे 5 हजार वाहक, चालक, यांत्रिक कर्मचारी, अधिकारी पंढरपूर येथे 10 ते 16 जुलै राहणार आहेत. यात्रा प्रवासादरम्यान भाविक प्रवाशांना अडचणी येऊ नये याकरिता वापरल्या जाणाऱ्या बसेस या निर्दोष व तंदुरुस्त असल्या पाहिजे. सर्व बसेस या स्वच्छ व आकर्षक राहतील याची काळची घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या 1 हजार 200 आकर्षक बसेस भाविक प्रवाशांच्या सेवेत प्रथमच वापरण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरकडे येणाऱ्या प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके सज्ज राहणार आहेत. यात्रा कालावधीत महाराष्ट्रातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक प्रवाशांच्या सोयीकरिता पंढरपूर येथे विभागनिहाय तात्पुरता बसस्थानकाची निर्मिती करण्यात येणार आहे. औरंगाबाद विभाग 1 हजार 97 बसेस, पुणे विभाग 1 हजार 80 बसेस, नाशिक विभाग 692, अमरावती विभाग 533, मुंबई विभाग 212,नागपूर विभाग 110 अशा ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
बसस्थानकावर सुविधा
यात्राकाळात प्रत्येक बसस्थानकावर उपाहारगृह, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय प्रवाशांकरिता महामंडळ करणार आहे. भाविकांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आव्हान एसटी महामंडळ प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT