विदर्भ

फायनान्स कंपनीची साडेबारा लाखांनी फसवणूक 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - वाहन कर्जाचे हफ्ते बुडवून फायनान्स कंपनीची तब्बल साडेबारा लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिथिलेश दुबे (61, रा. तेलंगखेडी मंदिराजवळ) आणि मोहम्मद मतील कुरेशी (40, रा. नांदेड) अशी आरोपींची नावे सांगण्यात येतात.

पोलिसांच्या माहितीनुसार मिथिलेश दुबे हिने सिव्हिल लाइन्स येथील टाटा मोटर्स फायनान्स सोल्युशन प्रा. लि. कंपनीतून फेब्रुवारी 2012 मध्ये 12.58 लाखांचे वाहनकर्ज घेतले. ठरल्याप्रमाणे महिलेने वाहन खरेदीही केले. पण, त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून सदर वाहन मोहम्मद कुरेशीच्या नावे करून दिले. कर्जाची परतफेड होण्यासाठी कंपनीने न्यायालयात धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधीकाऱ्यांच्या आदेशावरून तसेच कंपनीचे अधिकारी अनिल शाहू यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT