संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

स्वाइन फ्लू बाधितांचे सर्वाधिक मृत्यू खासगीत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः स्वाइन फ्लूसाठी उन्हाळा असो की पावसाळा. सारेच ऋतू सारखे झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात स्वाइन फ्लूचा विषाणू तग धरू शकत नाही हा आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला. जानेवारी ते आजपर्यंत स्वाइन फ्लू बाधितांची संख्या 366 वर पोहचली असून यातील 42 जण दगावले आहेत. विशेष असे की, सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्लू बाधितांचे मृत्यू अधिक असल्याचे पुढे आले आहे. स्वाइन फ्लू बाधितांचे 37 मृत्यू खासगीत तर सरकारी रुग्णालयात अवघे 5 मृत्यू झाले आहेत.
स्वाइन फ्लूचे विषाणू यंदाच्या वर्षी उकाड्याच्या तडाख्यातही तळ ठोकून होते. पुढे हिवाळा तोंडावर आहे. गारवा असलेले वातावरण या विषाणूसाठी सर्वाधिक पोषक असते. यामुळे स्वाइन फ्लूच्या मृत्यूने उपराजधानी हादरली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ऑगस्ट महिन्यात जास्त रुग्ण स्वाइन फ्लू बाधित आल्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. शासकीय रुग्णालयात आवश्‍यक औषधांचा साठा उपलब्ध आहे. स्वाइन फ्लूचा विषाणू रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये लवकर तग धरतो. विविध भागांत आढळलेल्या रुग्णांमध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील व्यक्तींचा समावेश आहे. येत्या काळात शासकीय रुग्णालयांना सजग राहण्याचा इशारा आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे. तर व्हेंटिलेटरची गरज असलेल्या स्वाइन फ्लू बाधित रुग्णांना वेळीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात यावे असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

मनपात होत नाही स्वाइन फ्लूवर उपचार
उपराजधानीत आरोग्याची दयनीय अवस्था असून महापालिकेचा आरोग्य विभाग स्वाइन फ्लूने होणारे मृत्यू उघड्या डोळ्यांनी बघत आहे. विशेष असे की, अवघ्या 9 महिन्यांत नागपूर विभागात स्वाइन फ्लूने 22 मृत्यूंची नोंद झाली. यापैकी 20 मृत्यू हे शहरातील आहेत. तरीही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र ढिम्म आहे. महापालिकेच्या एकाही रुग्णालयात स्वाइन फ्लू बाधितांवर उपचार होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरात विकासकामांचा ढिंढोरा पिटवला जात असताना आरोग्य सेवेची मात्र दैना आहे. विशेष असे की काही मृत्यू झाले आहेत. मात्र मृत्यू विश्‍लेषण समितीपुढे चर्चेला न आल्यामुळे ते मृत्यू नेमके कोणत्या आजारामुळे झाले, याची नोंद अद्याप करण्यात आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT