Mother and daughter were swept away in the floods 
विदर्भ

नियतीचा क्रूर खेळ : निंदनासाठी शेतात गेलेल्या माय-लेकीचा मृत्यू 

राजकुमार भितकर

दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील आरंभी येथील शेतामध्ये निंदनाकरिता गेलेल्या माय-लेकी मुसळधार पावसामुळे नाल्याजवळ अडकल्या. नाल्याचे पाणी कमी होत नव्हते तसेच पाऊसही सुरू असल्याने घर गाठण्याच्या घाईने त्यांनी पाण्यातून जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच घात झाला. पाण्याचा वेग जास्त असल्याने तसेच नाला खोल असल्याने नाल्यात उतरताच त्या पाण्यासोबत वाहू लागल्या. 

जाणून घ्या - पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...
 

गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्‍यात दररोज सायंकाळी मुसळधार पावसाची हजेरी सुरू आहे. काल सोमवारी (ता. 13 जुलै) पावसाने विश्रांती घेतली होती. मंगळवारी दिवसभर उघाड दिल्यानंतर सायंकाळी आभाळ दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बघता बघता पावसामुळे नाला दुथडी भरून वाहायला लागला. आरंभी चिरकुटा मार्गावरील गावालगत असलेल्या या नाल्याच्या पलीकडे शेतात गेलेल्या मायलेकी अडकून पडल्या होत्या. घरी जाण्याच्या घाईने त्या नाला पार करायला गेल्या आणि वाहून गेल्या. माहिती मिळताच तहसीलदार तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू होती. 

शेतामध्ये निंदनाकरिता गेलेल्या कविता किशोर राठोड (वय 35) व त्यांची मुलगी निमा किशोर राठोड (वय 15) या दोघी मायलेकी वाहून गेल्या. या दोघी मायलेकी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याचे कळताच गावकऱ्यांनी नाल्याच्या काठावर एकच गर्दी केली. आरंभी गावचे सरपंच यांनी तत्काळ ही माहिती तालुक्‍याच्या तहसीलदारांना दिली. माहिती मिळताच घटनेच्या तपासाकरिता दिग्रस तहसीलदार यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी टीमने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. वृत्त लिहीपर्यंत या दोघींचा पत्ता लागला किंवा नाही याबाबत माहिती मिळाली नव्हती. 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ‘कर्मकांडां’ची लांबलचक यादी! नाशिकचा भोंदू बाबा इंटरनेटवर ट्रेंडिंग; अशोक खरात केसने गाठली गुगल टॉप सर्च कॅटेगरी

Iran-Israel War: पाकिस्तानी जहाजाला इराणने दिलं हाकलून! भारताला मात्र मुभा, होर्मुजच्या सामुद्रधुनीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा विद्यार्थिनीवर हल्ला

Pachod News : पंचवीस वर्षापासून थेरगाव येथे हरिनाम सप्ताहसह गुढीपाडव्या निमित्त घरावर सात दिवस डोलतात गुढ्या

मिस कलरफुल पूजा सावंतचं स्कीन केअर रुटीन काय? अभिनेत्री म्हणाली, 'माझ्याही चेहऱ्यावर आधी मुरूम होते...

SCROLL FOR NEXT