Mansaram Bhoyar sakal
विदर्भ

Crime News : पैशाच्या वादातून साळ्याने केला जावयाचा खून

सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक चौकात पैशाच्या वादातून साळ्याने जावयाला लाथाबुक्यांनी मारले.

सकाळ वृत्तसेवा

मौदा - बुधवारी (ता.३) सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक चौकात पैशाच्या वादातून साळ्याने जावयाला लाथाबुक्यांनी मारले. उपचारादरम्यान जखमी जावयाचा मृत्यू झाला.

मन्साराम भोयर (वय ४८) हे पत्नी मंजुषा उर्फ माया व मुलगा अमन हे कुटुंब मौदा येथे राहात होते. मन्साराम भोयर हे कोणताही कामधंदा नसल्याने घरीच रहात होते. दामोधर बाळकृष्ण बुराडे हा मंजुषा भोयर हिचा लहान भाऊ आहे. त्याने वडिल मरण पावल्यानंतर मंजुषाचे लग्न करून दिले होते.

मे-२०२४ मध्ये मंजुषा हिचे वडिलोपार्जीत तुमसर येथे असलेले घर भाऊ दामोधर याला विकायचे होते. परंतु त्यामध्ये मंजुषा हिचे नाव असल्याने दामोदर नेहमी मंजुषा हिला स्वाक्षरी देण्यास तगादा लावित होता. परंतु मंजुषा त्याला वडिलाचे घर असल्यामुळे स्वाक्षरीस नकार द्यायला तयार नव्हती. त्यावर सही कर अन्यथा तुझ्या नवऱ्याला व पोटच्या पोराला संपवेन, अशी नेहमी धमकी द्यायचा.

त्यानंतर स्वाक्षरी न दिल्याने भाऊ दामोधर याने मनात राग धरला. मंजुषाच्या लग्नाकरिता पैसे खर्च केले असून व्याजासह पंधरा लाख रूपये परत कर, असे म्हणून तो नेहमी तिच्याशी भांडण करायचा. पंधरा दिवसांअगोदर भाऊ दामोधर मंजुषा हिच्या घरी आला. त्याने मंजुषाशी भांडण केले. तू पैसे दिले नाही तर तुझ्या नवऱ्याला व तुझ्या पोटच्या पोराला जिवाने मारून टाकेन, असा धमकी द्यायला लागला.

बुधवारी (ता.३) सकाळी साडेनऊच्या सुमारास दामोधर याने पैशाच्या वादातून काटा काढण्यासाठी भरचौकात भांडण करुन मारहान केली. त्यात मन्साराम हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दामोदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

RCB vs GT: विराट कोहलीने गुजरात टायटन्सला दाखवला, 'बाबाजी का ठूल्लू' अन् फायनलला पोहचताच अनुष्काला मारली मिठी; Video Viral

Beed: साखरपुड्यानंतर PSIने अचानक लग्नाला दिला नकार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा तरुणीच्या कुटुंबाचा आरोप

Sangli Crime: मुलगा होत नाही, माहेरहून सोनंही आणत नाहीस; पलूसमध्ये विवाहितेचा छळ, संशयास्पद मृत्यूने खळबळ

'लाल लाल करलची बांगडी...' संजू राठोडच्या गाण्यावर जान्हवी किल्लेकरचा डान्स, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT