crime 
विदर्भ

भयंकर! संपत्तीसाठी भाऊच उठला भावाच्या जीवावर!

सुरेंद्र चापोरकर

मोर्शी(जि. अमरावती) :  बाप बडा न मैय्या सबसे बडा रुपय्या असे म्हणतात ते काही खोटे नाही, कारण संपत्तीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना नुकतीच घडली.

नागपूर येथील जयहिंदनगर निवासी सय्यद अमीन सय्यद अली (वय ४१) या व्यक्तीची सोमवारी (ता. १०) रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान माणकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्घृण हत्या झाली. त्या खुनाचे धागेदोरे मोर्शीशी जुळले असल्याचे निदर्शनास आल्याने रात्री उशिरा तीन वाजेदरम्यान नागपूर येथील माणकापूर पोलिसांचे पथक मोर्शी येथे दाखल झाले. त्यांनी संशयितांना ताब्यात घेऊन नागपूरला नेले.

पोलिस उपनिरीक्षक के. पी. मगर हे त्यांची चमू व गुन्हे शाखा नागपूर शहर युनिट दोनच्या पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी तांबूस्कर यांच्या चमूसह मोर्शीत दाखल झाले. स्थानिक मोर्शी पोलिसांच्या मदतीने त्यांनी सै. आसिफ सै अली (वय ३८, रा. जयहिंदनगर नागपूर) याला मोर्शीतील शम्स कॉलनी येथून अटक केली. तसेच त्याचा सहकारी जावेद खान हबीब खान (वय ३४), तमीज खान हाफिज खान (वय २४), सादिक खान आबिद खान (वय २६) यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यावरून त्यांना तपास कामी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर वाचा -  खासदार नवनीत राणा यांना नागपूरला हलविले

याप्रकरणातील मृत सैय्यद अमीन हा अटक केलेल्या सैय्यद आसिफ सैय्यद अली याचा मोठा भाऊ असून त्यांच्यातील संपत्तीच्या वादातून सैय्यद अमीन याचा खून करण्यात आला असावा, असा संशय आहे. त्यासाठी सैय्यद आसिफने मोर्शीत सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला जीवे मारले असावे, असा अंदाज नागपूर पोलिसांतर्फे वर्तविण्यात येत आहे. पुढील चौकशीत सत्य पुढे येईलच, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पुढील तपास माणकापूर पोलिस करीत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT