विदर्भ

कोरोना महामारीही ‘कॅश’ : ‘रेमडिसिव्हीर’चे नागपूर, यवतमाळ कनेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोना रुग्णांवर (corona patient) उपचारासाठी प्रभावी ठरत असलेल्या ‘रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन’चा (Remedivir injection) काळाबाजार होत असल्याचा भंडाफोड झाला. वैद्यकीय महाविद्यालयातील (Medical College) नर्सने हे इंजेक्‍शन विक्रीसाठी काळ्याबाजारात आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या काळ्याबाजाराचे नागपूर, यवतमाळ कनेक्‍शन समोर आले आहे. (Nagpur, Yavatmal Connection of Remedivir Injection)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून, मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत आहेत. गंभीर स्थितीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्‍शनची गरज भासते. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात रेमडिसिव्हीर इंजेक्‍शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक भावात काळ्याबाजारात विक्री करून नफेखोरी केली जात आहे. कोविडबाधित रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईक रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन मिळविण्यासाठी औषध विक्रेत्यांची दुकाने पालथी घालत आहेत.

अव्वाच्यासव्वा किंमत मिळताच इंजेक्‍शन सहज उपलब्ध होत आहे. कळंब शहरात बनावट ग्राहक बनून गेलेल्या एलसीबी पथकाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी काळ्याबाजाराचा पर्दाफाश केला. सापळा रचून डॉ. अक्षय तुंडलवार, सावन पवार, सौरभ मोगरकर या तिघांसह दोन महिलांना अटक केली. नागपूर येथील शबाना अन्सारी हिला ताब्यात घेताच तिने चक्क वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत नर्स पूनम मेश्राम हिचे नाव घेतले. नर्सच रेमडिसिव्हीर इंजेक्‍शन पुरवीत असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी नर्सलाही बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे मेश्राम नामक नर्सची कोविड वॉर्डात ड्यूटी होती. गंभीर रुग्णांना इंजेक्‍शन न लावता त्यांच्या जिवाशी खेळत होती. तिने आतापर्यंत किती इंजेक्‍शनचा काळाबाजार केला, हे तपासण्याचे आव्हान आहे. कोरोना महामारीत लोकांचे जीव जात आहे. आपल्या आप्तस्वकीयांचा जीव वाचावा म्हणून नातेवाईक वाट्टेल तितका पैसा खर्च करीत आहेत. महामारीला ‘कॅश’ करण्याची संधीही काही जण सोडत नाहीत, हेच या घटनेवरून दिसून येते.

(Nagpur, Yavatmal Connection of Remedivir Injection)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT