nagpur
nagpur 
विदर्भ

नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या गोडाऊनमध्ये आग

अनिल कांबळे

नागपूर : वर्धा रोडवरील मध्यवर्ती कारागृहामध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. सदर आग ही कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये लागली आहे. दरम्यान अग्निशमन विभागाच्या एकूण ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निग्रस्त गोडाऊनचा वापर कारागृहातील सामान व अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो.

गोडाऊनला लागून असलेल्या बराकमध्ये सुद्धा आग पसरली असून ती विझवण्याचे काम सुरु आहे. या बरॅकमध्ये कोणीही कैदी नव्हता तर फक्त काही सामान ठेवण्यात आले होते.

अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या आतमध्ये प्रवेश करणे शक्य नसल्याने कारागृह इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतींच्या बाजूने बाहेरूनच आगीवर नियंत्रण मिळवले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT