Nagpur-Metro
Nagpur-Metro 
विदर्भ

ठरलं... पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी नागपूर मेट्रोचे लोकार्पण

सकाळवृत्तसेवा

नागपूर - नागपूरकरांची मेट्रो रेल्वेतून प्रवासाची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे. येत्या गुरुवारी, ७ मार्च रोजी मेट्रो रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करणार आहेत. मात्र, वर्धा रोडवरील साउथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर मुख्य कार्यक्रमाची तयार महामेट्रोने पूर्ण केली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मेट्रो सुरू करण्याचा निर्धार महामेट्रोने केला होता. त्या दृष्टीने वर्धा मार्गावरील एअरपोर्ट स्टेशनची कामेही पूर्ण झाली. यापूर्वी जमिनीवरील मार्गावरील खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साउथ स्टेशनची कामे पूर्ण झाली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून प्रवासी मेट्रोच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा महामेट्रो प्रशासनालाही होती. आता ७ मार्च रोजी लोकार्पणाची तयारी करण्याच्या सूचना महामेट्रोला मिळाल्याचे सूत्राने नमूद केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ७ मार्चला सायंकाळी मेट्रोला हिरवी झेंडी दाखविणार आहेत. मात्र, लोकार्पणाचा प्रमुख कार्यक्रम मेट्रोच्या एअरपोर्ट साउथ स्टेशनवर होणार आहे. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी प्रत्यक्षात मेट्रोला हिरवी झेंडी दाखविणार असल्याचेही सूत्राने नमूद केले. शहरात प्रवासी मेट्रो  सुरू करण्याबाबत महामेट्रोने आतापर्यंत आरडीएसओची परवानगी घेतली असून सध्या सीएमआरएसचे पथक नागपुरात असून त्यांचीही परवानगी येत्या दोन तीन दिवसांत मिळणार आहे. लोकार्पणानंतर वर्धा मार्गावर खापरी ते बर्डीपर्यंत मेट्रो सुरू होणार आहे. रविवारी(ता.३) सीएमआरएसच्या पथकाने सीताबर्डीपर्यंत पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT