विदर्भ

आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा?

सकाळन्यूजनेटवर्क

नागपूर : शासनाने पदोन्नतीत आरक्षण दिले. मात्र, त्याची माहिती सादर न केल्याने न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षणाचा निर्णय अवैध ठरविला. वेळेत माहिती सादर न करणे ही शासनाची मोठी चूक आहे किंवा यास अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. आज पदोन्नती रद्द केली, उद्या एखादा नियम लावून आरक्षणावर हात घातला जाईल. आरक्षण संपविण्यासाठी छुपा अजेंडा राबविला जात आहे का, असा सवाल संघर्ष वाहिनीतर्फे आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आला.

संघर्ष वाहिनीच्या वतीने विमुक्त भटक्‍या जमातीतील विविध सामाजिक व कर्मचारी संघटनातर्फे रविवारी पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर बैठक झाली. दीनानाथ वाघमारे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत ऍड. वरुण कुमार, ऍड. नीतेश ग्वालबन्सी, राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, राजू चव्हाण, धनराज खडसे, धर्मपाल शेंडे, किशोर सायगन, वनिता वजहाडे, गोविंद राठोड उपस्थित होते.

सरकारचाच या धोरणाला पाठिंबा असल्याने सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलेही तरी न्याय मिळेल याची शाश्‍वती काय, असा सवाल वाघमारे यांनी केला. बढत्या रद्द झाल्यास रस्त्यावर उतरून लढाई लढू, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi Statement : ''भारतात मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदूंपेक्षा जास्त होणार नाही'' ; ओवेसींचं मोठं विधान!

Sunetra Pawar: ''शपथविधीचा निर्णय पवार कुटुंबाचाच'', राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं मोठं विधान; पटेल, तटकरेंचा दोष नाही?

TET Exam Update: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘टीईटी’साठी मिळणार अधिक संधी; शासन बदलणार जीआर

ZP Elections 2026 Voting Live Update : बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केले

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

SCROLL FOR NEXT