विदर्भ

आरोपी मोकाटच; एक संशयित ताब्यात

सकाळवृत्तसेवा

नागपूर - लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर (३१) हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. पोलिसांनी तपासाची गती वाढविली असून, राहुलच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली. गुन्हे शाखा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. आरोपींच्या नातेवाइकांचीही चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी शोकाकुल वातावरणात राहुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेती दाखविण्याच्या बहाण्याने आरोपी दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे यांनी मंगळवारी राहुलचे त्याच्या घराजवळूनच एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केले. आरोपी त्याला बोलेरो गाडीतून घेऊन गेले होते. यानंतर आरोपींनी राहुलच्याच मोबाईलवरून त्याचा भाऊ जयेशला फोन करून एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. यानंतर राहुलचा मृतदेह पिटीचुहाच्या जंगलात जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. राहुलच्या नातेवाइकांनी प्रारंभी हा मृतदेह राहुलचा नसल्याची भूमिका घेत तो ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर मात्र नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दाखविली. गुरुवारी दुपारी आग्रेकर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. काही वेळासाठी मृतदेह घरी ठेवल्यानंतर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेशुद्ध करून जिवंत जाळल्याची शंका
प्राप्त माहितीनुसार, राहुलच्या शरीरावर शस्त्राने मारल्याच्या जखमा नाहीत. त्याला जाळण्यात आले आहे. यावरून आरोपींनी राहुलला पहिले बेशुद्ध केले असावे आणि नंतर जिवंत जाळले असावे, अशी शंका आहे. डॉक्‍टरांनीही तशीच शंका व्यक्त केली असल्याचे कळते. राहुल शुद्धीत असता तर त्याने झटापट केली असती. पण, तसला प्रकार झाला नसल्याचा अंदाज मृतदेहाच्या स्थितीवरून बांधण्यात येत आहे. राहुलला बेशुद्ध केल्यानंतर आणि त्याची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी खंडणीसाठी फोन केला असावा, अशीही शक्‍यता आहे.

आरोपींचा  मध्यप्रदेशात शोध
राहुलचा खून केल्यानंतर आरोपी बोलेरोनेच नरसिंगपूला पळून गेले. या गाडीमुळे सापडले जाण्याची भीती होती. यामुळे त्यांनी पंकजच्या वीटभट्टीवर काम करणारा मजूर जॉकी याच्या स्वाधीन करीत गाडी नागपूरला सोडून देण्यास सांगितले. जबलपूर मार्गावर टोलनाक्‍यावरून गाडी पुढे जाताच ही बाब पोलिसांना कळाली. ऑटोमोटिव्ह चौकात सापळा रचून पोलिसांनी जॉकीसह बोलेरो ताब्यात घेतली. त्याने दोन्ही आरोपीला नरसिंगपूरला आल्याची कबुली दिली. पोलिस नरसिंगपूरला पोहोचले. पण, तोवर पंकज आणि दुर्गेश तिथून पळून गेले होते. पंकजच्या वीटभट्टीवर झारखंडचे मजूर कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने आरोपी झारखंडमध्ये जाण्याची शक्‍यता असून त्या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दुर्गेश आणि पंकजच्या नातेवाइकांना चौकशीसाठी बोलावून त्यांची कसून चौकशी केली. नातेवाईक कुठे राहतात, आरोपी कुठे जाऊ शकतात, याची माहिती घेऊन तपास सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT