विदर्भ

सौदी अरेबियातून केली महिलेची सुटका

सकाळवृत्तसेवा

नागपूर  - नोकरीचे आमिष दाखवून २ लाख रुपयांत सौदी अरेबियात विकण्यात आलेल्या महिलेची सुटका करण्यात सक्करदरा पोलिसांना यश आले. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातून महाराष्ट्र पोलिसांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीयांच्या मदतीने सक्‍करदरा पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला. तेथील नागरिकांच्याच मदतीने विक्री करण्यात आलेल्या महिलेला नागपुरात आणण्यात आले, हे विशेष.

रुखसाना शेख (३५, रा. मोठा ताजबाग, सक्करदरा) असे सुटका करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी जून महिन्यातच तीन अरेबियन नागरिकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सम्मा बेगम व हाजी साहेब यांना अटक केली होती. ते आज जामिनावर बाहेर आहेत. तर सईद व मुस्तफा अशी दोन मुंबईतील दलालांची नावे आहेत. तर शेख नावाचा पाचवा आरोपी हा सौदी अरेबिया येथील आहे. हे तीनही आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताजाबाग परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेला मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सौदी अरेबियात विकण्यात आले होते. बोरगाव, सेंट मार्टीन शाळेजवळ राहणाऱ्या सम्मा बेगम या आरोपी महिलेने येथीलच एका हाजी साहेबाच्या मदतीने रुक्‍सानाला मुंबईला नेले. 

तेथे सईद व मुस्तफा नामक दलालाने व्हिसा आणि तिकीट बनवून दिल्यानंतर ९ सप्टेंबर २०१६ ला तिला दुबईत पाठविण्यात आले. तेथे एका हॉटेलमध्ये ठेवून शेख नावाचा आरोपी तिच्याकडून काम करवून घ्यायचा. 
महिनाभरानंतर तिने वेतन मागितले असता तुला आम्ही दोन लाखांत विकत घेतल्याचे त्यांनी पीडित महिलेला सांगितले. 

नोकरीचे स्वप्न भंगल्यामुळे तिने मायदेशी परत जाण्यासाठी तगादा लावला असता आरोपी तिला मारहाण करू लागले. एक दिवस संधी साधून तिने आपल्या बहिणीला फोन करून आपबिती सांगितली. तिने थेट सक्करदरा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तेव्हापासून सक्करदरा पोलिसांनी सौदी अरेबियातून महिलेची सुटका कशी करता येईल, याबाबत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. शेवटी त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने महिलेची सुटका केली. ही कामगिरी सक्करदरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सांदिपान पवार, पोलिस उपनिरीक्षक राठोड यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT