विदर्भ

'योगावर विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम असावा'

सकाळवृत्तसेवा

नागपूर - भारतीय संस्कृतीची देण असलेल्या योगशास्त्रावर विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम तयार व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्ती केली. संपूर्ण विश्‍वात योगाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी मोठ्या संख्येने योगशिक्षक तयार होण्याची गरज व्यक्त करत गडकरींनी या प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी नागपूर वा संस्कृत विद्यापीठाने पुढाकार घेण्याची इच्छाही व्यक्त केली. 

सांघिक योगासनांचा देशभर प्रचार-प्रसार करणाऱ्या योगमूर्ती जनार्दनस्वामींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित तीनदिवसीय अखिल भारतीय योग संमेलनाचा समारोप रविवारी (ता. १९) झाला. संमेलनाच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. या वेळी कांचन गडकरी, नगरसेविका रूपा रॉय, नगरसेविका परिणिता फुके, रामभाऊ खांडवे उपस्थित होते. संपूर्ण विश्‍वाला योगाची ओळख करून देणाऱ्या भारताचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. आजघडीला भारताप्रमाणेच विदेशातही योगाला आत्मसात करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने योगाची दखल घेतली असून, याचा विस्तार अधिकाधिक होण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. जनार्दनस्वामींनी सुरू केलेली नि:शुल्क योगाभ्यासाची चळवळ आधुनिक काळाशी सुसंगत करून  आकर्षक पॅकेजिंगच्या माध्यमातून मांडणे आवश्‍यक आहे. हजारो युवक योगाभ्यासाचा प्रचार करताहेत. परंतु, जोवर या शास्त्राला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून अभ्यासक्रमाद्वारे पुढे आणले जाणार नाही, तोवर ही चळवळ मर्यादित राहील, अशी भीती या वेळी गडकरींनी व्यक्त केली. 

योगशास्त्रावर आधारित अभ्यासक्रमासाठी रामभाऊ खांडवे यांना आवश्‍यक ती सर्व मदत केंद्र सरकारतर्फे करण्यात येईल, असे आश्‍वासनदेखील त्यांनी दिले. जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे नि:शुल्क योग शिकविला जातो. परंतु, मोफत मिळणाऱ्या गोष्टीची लोकांना किंमत नसल्याचे सांगत यासाठी माफक शुल्क आकारून जमा झालेली रक्कम योगाच्या प्रचारार्थ खर्च करण्याचे आवाहन त्यांनी केले. समारोपीय सत्राचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन रामभाऊ खांडवे यांनी केले. 

भानूताई गडकरींच्या स्मृतीप्रीत्यर्थ योग स्पर्धा
नितीन गडकरी यांच्या आई भानूताई या जनार्दनस्वामींच्या शिष्या होत्या. त्यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत नि:शुल्क योग शिकवणीचे वर्ग घेतले. योगाच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याला समर्पित अशी ‘भानूताई गडकरी स्मृती शालेय योग स्पर्धा’ येत्या जानेवारीमध्ये सुरू करण्याची घोषणा या वेळी मंडळातर्फे करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान गडकरींनीदेखील आई आणि जनार्दनस्वामींच्या आठवणींना उजाळा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT