विदर्भ

नागपूरच्या रस्त्यांवर काळोख, नागरिकांच्या जिवाला धोका

सकाळ वृत्तसेवा

नागपूरः शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तक्रार करूनही पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नसल्याची तक्रार आज दहाही झोनच्या सभापतींनी अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ऍड. संजय बालपांडे यांच्याकडे केली. झोन सभापतींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत व्यक्त करीत प्रशासनावर ताशेरेही ओढले.
महापालिकेत आज अग्निशमन व विद्युत विशेष समितीची बैठक पार पडली. या वेळी ऍड. संजय बालपांडे यांनी दहाही झोनच्या सभापतींची गाऱ्हाणी ऐकली. या तक्रारीवर गांभीर्याने दखल घेत तातडीने झोन सभापतींच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश सभापती ऍड. संजय बालपांडे यांनी दिले. पथदिवे बंद असल्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींवर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. यासाठी नागरिकांची सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या वेळी त्यांनी अग्निशमन सुरक्षा यंत्रणेवरूनही प्रशासनाला धारेवर धरले. शहर विकास आराखड्यात अग्निशमन स्थानाकरिता आरक्षित झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा या जागा ताब्यात घेणे, अग्निशमन विभागातील जुने स्थानक लकडगंज, गंजीपेठ व न्यू कॉटन मार्केट पाचपावली विभागातील जुने स्थानक पुनर्बांधकाम करणे, राठोड ले-आउट येथील अग्निशमन स्थानकाकरिता असलेली जागा ताब्यात घेणे, वाठोडा अग्निशमन स्थानकाचे बांधकाम करणे, पथदिव्यांच्या दुरुस्ती व सुस्थितीकरिता नियुक्त एजन्सीची कामगिरी व सर्व प्रभागअंतर्गत बंद असलेल्या विद्युत दिव्यांबाबत चर्चा करण्यात आली.

अग्निशमन यंत्रणेचा अभाव, फौजदारी कारवाईचे निर्देश
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मोठ्या इमारती, सदनिका, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठान आदी ठिकाणी अग्निशमन सुविधा असणे आवश्‍यक आहे. अग्निशमन सुरक्षा व्यवस्था नसलेल्या इमारत मालकांना वेळोवेळी नोटीस देण्यात येते. मात्र, अनेकदा नोटीस देऊनही त्यावर इमारत मालकांकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. यावर ऍड. बालपांडे यांनी महाराष्ट्र आग प्रतिबंधन जीव संरक्षण उपाय योजना अधिनियमानुसार नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर फौजदार कारवाई करण्याचे निर्देश ऍड. संजय बालपांडे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagzari River Drowning : नागझरीच्या नदीत बुडून तिघांचा मृत्यू, दोन बालकांसह तरुणाचा समावेश, खेड तालुक्यातील घटना

Who Is Gurnoor Brar? मोहम्मद शमीपेक्षा ६.५ फुटाच्या गोलंदाजाची कसोटी व वन डे संघात निवड करावी वाटली! हा खेळाडू आहे तरी कोण?

Mumbai Bandra Encroachment Drive: वांद्रे गरीब नगरमध्ये रेल्वेची मोठी कारवाई; ५२०० चौ.मी. अतिक्रमणमुक्त मोहिमेला सुरुवात, पहिल्याच दिवशी १०० बांधकामे जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरेंची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

SCROLL FOR NEXT