नागपूर - कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करताना विद्यार्थी.
नागपूर - कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करताना विद्यार्थी. 
विदर्भ

फेरमूल्यांकनातील उत्तीर्णांना प्रवेश द्या

सकाळवृत्तसेवा

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील फेरमूल्यांकनामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्गात प्रवेश मिळावा यासाठी शनिवारी (ता. १५) दुपारपासून सायंकाळपर्यंत कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठाने कायदेशीर बाब समोर करून मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुलगुरु आणि कुलसचिवांविरोधात घोषणाबाजी केली. 

विद्यापीठाने हिवाळी परीक्षेचे निकाल झटपट दिलेत. मात्र, फेरमूल्यांकनाचे निकाल देण्यास जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लावला. यामुळे ६ सप्टेंबर प्रवेशाची अंतिम तारीख असताना, निकाल बारा सप्टेंबरला लागले. निकालात उत्तीर्ण झालेल्या पदवी अभ्यासक्रमातील बऱ्याच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार असल्याने त्यांनी प्रवेशाची परवानगी देण्याची मागणी केली. त्यासाठी परीक्षा नियंत्रकासह प्र-कुलगुरुंचे कार्यालय गाठले. त्यांनी यावर कुलगुरुंना निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यामुळे शनिवारी (ता. १५) विद्यार्थ्यांनी एनएसयूआय आणि अभाविपच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुलगुरुंची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. 

मात्र, कुलगुरुंनी मागणी मान्य करण्यास नकार दिला. यामुळे विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यानंतर कुलगुरुसह परीक्षा नियंत्रकांविरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांनीही कुलगुरुंशी चर्चा केली. 

चर्चेदरम्यान यासंदर्भात कुलगुरुंनी विद्यार्थ्यांच्या ९० दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने प्रवेश देता येणे शक्‍य नसल्याचे सांगितले. तसेच न्यायालयात प्रकरण असल्याने परवानगी दिल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असेही स्पष्ट केले. यावेळी तांत्रिक बाब लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणे शक्‍य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, बराच उशिरापर्यंत विद्यार्थी कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले होते.

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले 
विद्यापीठाने यावर्षी पदव्युत्तर प्रवेश ऑनलाइन पद्धतीने दिलेत. मात्र, ते प्रवेश देताना फेरमूल्यांकनाचे निकाल न लागलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण गुणपत्रिकेवर प्रक्रियेतही सहभागी होता आले नसून तात्पूरता प्रवेश देण्यास महाविद्यालयांनी नकार दिला. त्यात फेरमूल्यांकनाचे निकालास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आणि त्यांचे वर्षही वाया गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT