file photo
file photo 
विदर्भ

नागपूर विद्यापीठ होणार सोशल मीडियावर सक्रिय 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांशी प्रभावीपणे अंतर्मुख होण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून तसे निर्देश विद्यापीठाला मिळाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात विद्यापीठाद्वारे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर सक्रिय होत अकाउंट उघडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. 
जगात फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाची चलती आहे. या साईट्‌सवर तरुणाई मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे एखाद्या विषयाची माहिती आणि त्याबद्दलचे मत काही वेळातच जाणून घेता येणे शक्‍य होते. एखादा निर्णय घेतल्यावर तो संकेतस्थळावर टाकण्यापूर्वी "ट्विटर' वा "फेसबुक'वर टाकताच तो अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचतो. 
दुसरीकडे अनेकदा वर्तमानपत्रात येणाऱ्या बातमीसंदर्भात विद्यापीठाची भूमिका स्पष्ट होताना दिसून येत नाही. तसेच एखाद्या घटनेवर आपले मत वा खुलासा देता येणे शक्‍य होत नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका मांडण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने सोशल मीडियाची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी विद्यापीठ "ट्विटर' आणि "फेसबुक'सारख्या सोशल साईट्‌सवर दिसणार आहे. या अकाउंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनाही यावर व्यक्त होता येणार आहे. विद्यापीठाचे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या अकाउंटचे अधिकृत हॅन्डलर म्हणून लवकरच विद्यापीठाद्वारे एका शिक्षकाची "सोशल चॅम्पियन' म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. काणे यांनी सांगितले. 
विद्यापीठाद्वारे सोशल मीडियावर अकाउंट्‌स तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधता येणे शक्‍य होईल. तसेच विद्यापीठाची एखाद्या विषयावर भूमिकाही स्पष्ट करता येईल. 
डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT