विदर्भ

डॉ. दीपक बजाजला पुन्हा दणका

सकाळवृत्तसेवा

नागपूर - अपसंपदेप्रकरणी जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. दीपक खुबचंद बजाज याने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून नव्याने दाखल केलेला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. यापूर्वी देखील वैद्यकीय कारणावरून बजाज याने जामीन मागितला होता. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ सप्टेंबर २०१५ रोजी दीपक बजाज यांचा साईकृपा प्रिन्सिपल बंगलो, शाळेचे कार्यालय, सोसायटी कार्यालय आदी प्रतिष्ठानांवर धाड टाकली. यामध्ये १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख आणि २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किमतीचे घरगुती सामान, अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळली. या प्रकरणी २६ सप्टेंबर २०१५ रोजी जरीपटका पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २९ सप्टेंबर रोजी पुन्हा सिंधू एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय तसेच कार्यालय परिसरातील प्रिंटिंग प्रेसचे पुरावे गोळा करण्याच्या हेतूने झडती घेतली असता, पतसंस्थेच्या गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती.

दीपक बजाजला १२ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. २६ नोव्हेंबर २०१५ पासून तो कारागृहात आहे. बजाजने यापूर्वीदेखील मधुमेहाच्या त्रासामुळे वारंवार इस्पितळात दाखल करावे लागत असल्याचे कारण देत जामीन मागितला. मात्र, प्रत्येक वेळी तो नाकारण्यात आला. मागील वेळी सादर करण्यात आलेल्या कारणासाठी नव्याने दाखल करण्यात आलेला अर्ज मंजूर करण्यास नकार दिला. याप्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT