विदर्भ

नागपूरमार्गे दोन विशेष रेल्वेगाड्या

सकाळवृत्तसेवा

नागपूर - नवरात्री, दसरा व दिवाळीत रेल्वेगाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त पूजा स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नागपूरमार्गे अतिरिक्त तीन विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत.

संतरागाछी-राजकोट वातानुकूलित सुपरफास्ट पूजा स्पेशल ट्रेन २२ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान एकूण १० फेऱ्या करणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांची सुविधा होणार असली  तरी त्यासाठी विशेष शुल्क मोजावे लागणार आहे. ०२८३४ संतरागाछी-राजकोट विशेष रेल्वे  २२ सप्टेंबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवारी रात्री ९.०५ वाजता संतरागाछी येथून रवाना होऊन शनिवारी दुपारी ३.०५ वाजता नागपूर स्थानकावर येईल आणि रविवारी दुपारी १.४५ वाजता राजकोट स्थानक गाठेल.०२८३३ राजकोट-संतरागाछी सुपरफास्ट ट्रेन २४ सप्टेंबर  ते २६ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक रविवारी रात्री १०.२० वाजता राजकोट येथून रवाना होऊन सोमवारी रात्री १० वाजता नागपूर स्थानकावर येथील आणि मंगळवारी दुपारी ४.३५ वाजता संतरागाछी स्थानक गाठेल. 
याचप्रमाणे पुणे- संतरागाछी साप्ताहिक वातानुकूलित पूजा स्पेशल ट्रेन ७ ऑक्‍टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान एकूण ८ फेऱ्या करणार आहे. ०२८२२ संतरागाछी-पुणे विशेष ट्रेन ७ ऑक्‍टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता संतरागाछी येथून रवाना होऊन रविवारी सकाळी ११.१५ वाजता नागपूर स्थानकावर आगमन होईल आणि सोमवारी मध्यरात्री २.४५ वाजता पुणे स्थानक गाठेल. ०२८२१ पुणे-संतरागाछी साप्ताहिक ट्रेन ९ ऑक्‍टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक सोमवारी १०.३० वाजता पुणे स्थानकावरून रवाना होऊन मंगळवारी मध्यरात्री १.२० वाजता नागपूर स्थानकावर दाखल होईल आणि मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता संतरागाछी स्थानक गाठेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT