File photo
File photo 
विदर्भ

जलसंकट प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह

सकाळवृत्तसेवा

जलसंकट प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह
नागपूर, ता. 22 ः पाण्याची सद्यस्थिती, जलसंकटाची स्थिती यावर विशेष सभा बोलावण्याची महापौरांनी सभागृहात घोषणा केली होती. परंतु, केवळ दोन तासांची विशेष सभा बोलावून प्रशासन केवळ औपचारिकता पूर्ण करताना दिसून येत आहे. त्यामुळे जलसंकटाबाबत प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष सभेनंतर लगेच सर्वसाधारण सभा असल्याने जलसंकटावर चर्चा कशी होईल? असा प्रश्‍न काही नगरसेवकांनी उपस्थित केला असून हा हात वर करण्याचा प्रकार असल्याचा आरोपही केला आहे.
शहरात यंदा पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नुकताच याबाबत बैठक घेऊन आढावा घेतला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनोज सांगोळे या नगरसेवकांनी मागील सभेत सध्याची पाण्याची स्थिती व प्रशासनाची उपाययोजनाबाबत तयारीवर चर्चेची मागणी केली होती. यावरून सभागृहात गोंधळही झाला होता. महापौरांनी विशेष सभा बोलावण्याचे प्रशासनाला निर्देश दिले होते. 3 नोव्हेंबरला विशेष सभा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. परंतु, दिवाळीमुळे विशेष सभा प्रशासनाच्या विस्मरणात गेली. त्यामुळे नगरसेविका आभा पांडे यांनीही या विशेष सभेची आठवण महापौरांना करून दिली होती. जलसंकटाचा नगरसेवकांनी धसका घेतला आहे. प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहे, याबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे विशेष सभेची मागणी पांडे यांनी केली होती. येत्या 30 नोव्हेंबर रोजी प्रशासनाने विशेष सभेचे आयोजन केले आहे. परंतु, विशेष सभा सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. अर्थात केवळ दोनच तास विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर लगेच सर्वसाधारण सभा आहे. त्यामुळे पाण्यावर, जलसंकटावर दोन तासांत कशी चर्चा करणार? असा प्रश्‍न नगरसेवकांना पडला आहे.
प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्‍न
केवळ दोन तासांच्या अवधीमुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष सभा ही विशेषच व्हायला हवी. यात अनेक सूचनांसह प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्‍न उपस्थित केले जातात, दोन तासांत हे कसे शक्‍य आहे, अशी चर्चा नगरसेवकांत रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT