170 species of colorful butterflies in Pench 35 new species Participation of citizens of 15 states Sakal
नागपूर

Butterflies : पेंचमध्ये विविधरंगी १७० फुलपाखरांच्या प्रजाती

३५ नवीन प्रजातींचा समावेश : १५ राज्यातील नागरिकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात नागरिक-विज्ञानवर आधारित मान्सूनपूर्व आणि उत्तरोत्तर सर्वेक्षणात १७० प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. पहिल्या सर्वेक्षणात १३५ फुलपाखरांची तर दुसऱ्या सर्वेक्षणात ३५ नवीन प्रजातींचा समावेश झाला आहे. या सर्वेक्षणात १५ राज्यांतील नागरिक सहभागी झाले होते.

पेंच प्रकल्पात तीन ते पाच नोव्हेंबर या कालावधीत नागरिक विज्ञानावर आधारित मान्सूननंतरचे फुलपाखरू सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी तांत्रिक सहकार्य टिन्सा इकॉलॉजिकल फाउंडेशन या संशोधनावर आधारित स्वयंसेवी संस्थेचे घेतले आहे. सर्वेक्षणाचा वापर करून फुलपाखरांची विविधता आणि घनता यावर हंगामी डेटा तयार करणे हा यामागचा उद्देश आहे.

असे सर्वेक्षण पाश्चात्त्य देशांमध्ये केले जाते. भारतातील संरक्षण क्षेत्रात जैवविविधता सर्वेक्षणांवरील डेटा संकलनात सहयोग आणि योगदान देण्यासाठी अशा सर्वेक्षणाचा उपयोग होतो. सर्वेक्षण करताना तीन ते चार टीममध्ये सहभागींची विभागणी केली होती. प्रत्येक संघाला एका कुटीचे वाटप केले होते. एकूण ४२ संघांनी ४२ नमुना बिट्स शिबिरांचा समावेश केला. टिन्सा टीमने डिझाइन केलेल्या सर्वेक्षणादरम्यान फुलपाखरांच्या विविधतेची नोंद करण्यासाठी पोलार्डच्या चालण्याच्या पद्धतीचा अवलंब केला.

विनामूल्य ऑफलाइन आधारित ‘कोबो कलेक्ट’ अॅपवर डेटा संकलित केला गेला. अॅपने प्रत्येक दृश्यांची नोंद त्याच्या भौगोलिक-स्थानासह केली. पेंचमध्ये प्रथम मान्सूनपूर्व सर्वेक्षण मार्च २०२३ मध्ये करण्यात आले. त्यामध्ये ४७ नवीन रेकॉर्डसह १३५ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली होती.

उपसंचालक आणि प्रभारी क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला आणि सात वन परिक्षेत्र अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर आणि तिन्साचे सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाना, आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक, गुजरात, केरळ, तेलंगणा या १५ राज्यांमधून एकूण १२६ स्पर्धकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता.

त्यात ५० टक्के महिला होत्या. त्यात मुख्यतः गुरू घासीदास विद्यापीठ, छत्तीसगडचे विद्यार्थी होते; दिल्ली विद्यापीठ, कोटा विद्यापीठ, राजस्थान; इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, नागपूर; पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. दरम्यान, कोबो अॅपमध्ये एकूण ७७०० पेक्षा अधिक वैयक्तिक फुलपाखरांच्या नोंदी एकत्रित केल्यात. त्यात ३५ नवीन फुलपाखरांसह एकूण १४६ प्रजातींची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT