गेल्या काही दिवसांपासून 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाची चर्चा रंगली होती. अखेर झी मराठी चला हवा येऊ द्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. यंदा प्रेक्षकांना विनोदाचा गँगवॉर पहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये अभिजीत खांडेकर, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, ओंकार मोरे, कुशल बद्रिकेसह प्रियदर्शन जाधव पहायला मिळाला.