Corona
Corona Media Gallery
नागपूर

रस्त्यावरच कोरोना टेस्टचा धडाका, दुसऱ्या दिवशीही आढळले १८ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळत नाही. त्यावर उपाय शोधत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी थेट रस्त्यावरच कोरोना टेस्ट करण्याचे अभियान हाती घेतले. रविवारी विनाकारण फिरत असलेल्या ४३४ जणांना पोलिसांनी पकडले. त्यांची कोरोना टेस्ट केली. त्यापैकी १८ जण कोरोनाबाधित आढळले. बाधितांची लगेच विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली.

लॉकडाउनला नागपूरकरांनी गांभीर्याने न घेतल्याने पोलिसांनाच आक्रमक भूमिका घ्यावी लागली. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. शनिवारी पहिल्याच दिवशी शहरात विनाकारण फिरत असलेल्या २५५ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यात १८ जण बाधित निघाले. त्यांना ताबडतोब पोलिसांनी व्यवस्था केलेल्या विलगीकरणात रवाना केले. कोरोनाची परिस्थिती हाताळताना शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून, प्रशासनही हतबल आहे. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली. तरीही लोकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने कठोर पावले उचलली आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून, विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. आता पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. जुना काटोल नाका, ऑटोमोटिव्ह चौक, मेयो चौक, मानेवाडा चौक आणि प्रतापनगर चौकात महापालिकेच्या मदतीने अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली. या ठिकाणी शहरातील पोलिस उपायुक्त विनीता शाहू, नीलोत्पल, लोहित मतानी, विवेक मासळ आणि नुरुल हसन यांनी नेतृत्व केले. स्वतः डीसीपींनी पोलिसांनी रस्त्याने ये जा करणाऱ्यांची चौकशी केली असता कुणी किराणा घ्यायला, कुणी औषधासाठी जातान दिसले. बऱ्याच प्रमाणात लोक कामावर जाण्यासाठी निघाले होते. विनाकारण फिरणाऱ्या ४३४ जणांची टेस्ट करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT