20 Municipal students will fly satellite ISRO nagpur Sakal
नागपूर

Nagpur News : मनपाचे विद्यार्थी उडविणार उपग्रहाचा पतंग

पुढील महिन्यात इस्त्रोला देणार भेट ; २० मुलांचा समावेश

- राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेच्या शाळेतील मुलांनी वारंवार गुणवत्ता सिद्ध करीत यशाचा झेंडा रोवला आहे. याच मालिकेत आता पुन्हा एकदा महापालिका शाळांतील २० मुलांनी आपली गुणवत्ता सिद्ध करीत लघु उपग्रह निर्मितीचे धडे घेण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. ही मुले पुढील महिन्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) उपग्रह निर्मितीची प्रक्रिया जवळून बघणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे अंतराळात सोडले जाणारे उपग्रह, त्यांचे तंत्रज्ञान, संशोधन हा विषय नेहमीच मुलांच्या उत्सुकतेचा असतो. अंतराळातील विविध घटना, घडामोडी नेहमीच मुलांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. महापालिकेच्या शाळेतील मुलेही अपवाद नाही. या मुलांनीही इस्त्रोमध्ये जाण्यासाठी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. महापालिकेच्या विविध शाळांतील २० मुलांची निवड इस्त्रोमध्ये जाण्यासाठी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने मागील आठवड्यात ४० मुलांची चाचणी घेतली. यातील नववी व दहावीतील २० मुलांची निवड करण्यात आली. २१ फेब्रुवारीला रामेश्वरम येथे इस्त्रो मोठे उपग्रह अंतराळात सोडणार आहे. यासोबत एक लघु उपग्रहही सोडणार आहे.

ही मुले पुढील महिन्यात १५ तारखेला नागपुरातून जाणार असून इस्‍त्रो संस्थेत तीन ते चार दिवस स्पेस सायन्सचे धडे गिरवणार आहे. यादरम्यान या मुलांना लघु उपग्रह कसा तयार करतात, तो अंतराळात कसा सोडतात, ही सर्व प्रक्रिया जवळून बघता येणार असून त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही शोधणार आहेत.

प्रत्येकी १५ हजार रुपये खर्च

या मुलांसोबत महापालिका शाळेतील दोन शिक्षकांना पाठविण्यात येणार आहे. ही मुले २३ फेब्रुवारीला नागपुरात परत येतील. महापालिका शाळेतील शिक्षणाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उभे केले जातात. परंतु गेल्या काही वर्षात महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावत असल्याचे मुलांच्या निवडीने अधोरेखित केले.

२० पैकी दहा मुलांचा खर्च एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन करणार असून दहा मुलांचा खर्च महापालिका करणार आहे. एका मुलाला १५ हजार रुपये खर्च येणार आहे. महापालिकेची ही गुंतवणूक भविष्यात नागपूरला अंतराळ शास्त्रज्ञ नक्कीच देणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लघु उपग्रह निर्मितीचे धडे घेण्याची मनपा शाळेतील मुलांना संधी आहे. भविष्यात ही मुले शास्त्रज्ञ म्हणून पुढे येईल व शहराचा लौकिक वाढवेल. २० मुलांपैकी महापालिका दहा मुलांचा तर एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन दहा मुलांचा खर्च करीत आहे.

- राजेंद्र पुसेकर, शिक्षणाधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT